शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी रोखले रेती वाहतुकीचे ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:58 IST

मोहाडी तालुक्यातील मुंढरी रेतीघाटाचा लिलाव होऊन याच गावातील रस्ता वाहतुकीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रकरण मुंढरी येथील : रेतीचा उपसा व वाहतूक करार भंगाबाबत चौकशीची मागणी

आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील मुंढरी रेतीघाटाचा लिलाव होऊन याच गावातील रस्ता वाहतुकीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, लिलावधारकांनी अटी, शर्ती व करारनाम्याचा भंग करीत कान्हळगाव हद्दीतून उपसा व वाहतूक करीत आहेत. प्रशासनाची परवानगी न घेता रेती साठवणुकीसाठी शासकीय जागेचा वापर करीत आहे. यासाठी नर्सरीतील झाडाच्या कत्तली करण्यात आल्याचा आरोप करीत कान्हळगाव येथील महिलांनी शेकडो ट्रक शुक्रवारला सकाळी रोखून धरले.कान्हळगाव येथील महिलांनी रेतीचा अवैध उपसा व वाहतुकी विरोधात आंदोलन करीत कान्हळगाव हद्दीतील रस्ता रोखून धरल्याने कान्हळगाव येथे ट्रकांच्या रांगा लागलेल्या होत्या. सकाळपासूनच महिलांनी एकही ट्रक गावातून व गावाच्या हद्दीतून जावू दिला नाही. शासकीय जागेच्या वापर करण्यासाठी मनाई केली. नर्सरीतील झाडांची नुकसानभरपाई करा, अशी मागणी महसुल व पोलीस विभागाच्या अधिकाºयांना केली. पंरतू दुपारपर्यंत महसुल विभागातूक कुणी आंदोलनस्थळी पोहचले नाही. करडी पोलिसांनी भेट दिली. मात्र, प्रकरण महसुल विभागाच्या अधिकारातील असल्याचे सांगून आपण तोडगा काढू शकत नसल्याचे सांगत पोलिसांनी काढता पाय घेतला. त्यामुळे आंदोलकांनी लिलावधारकांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करीत असंतोष व्यक्त केला.रेतीच्या ट्रकांची वाहतूक व शासकीय जागेचा वापर करण्यासाठी मनाई केल्यानंतर वैनगंगा नदीपासून कान्हळगाव पर्यंत ट्रकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. मंढरी ते खडकी रस्त्यावरही ट्रक उभे करण्यात आल्याने वाहतुकीला कमालीचा अडथळा निर्माण झाला होता.मुंढरी (बुज.) व्यतिरिक्त कान्हळगाव नदीतून रेतीचा अवैध उपसा होत आहे. करारनाम्यानुसार अर्धा मीटर रेतीचे उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली असताना दोन मीटरपर्यंत अवैध उपसा होत आहे. नदीतून रेती काढून शासकीय जागेतून वाहतूक करीत साठवणूक करण्यासाठी परवानगी घेण्यात आली नाही.साठवणूक केलेली रेती दोन पोकलँड मशीनच्या सहायाने उपसा करीत आहे. या गैरप्रकारामुळे कान्हळगाव येथील वाहतुकीच्या रस्त्याची दुरावस्था होत असून शेतीचेही नुकसान होत आहे.गुरूवारला रात्री १० वाजतापर्यंत रेतीघाटाची पाहणी केली. डंपीगसाठी एका जागेचा एनए केलेला आहे. मात्र, त्या शेजारील शासकीय जागेचा अनधिकृत वापर होत असल्याने अकृषक दंडाची आकारणी केली जाईल. मुंढरी घाटाच्या करारनाम्यात वाहतुकीसाठी त्याच गावातील रस्ता प्रस्तावित करण्यात आला असून त्याच रस्त्याचा वापर व्हायला हवा. तशा सूचना लिलावधारकांना दिले आहेत. ट्रक अडवून धरल्याची माहिती कुणीही दिली नाही. करडीचे ठाणेदारांनी आंदोलन होण्याची माहिती दिली. कान्हळगाव येथील महिलांनी ट्रक अडवून धरले असल्यास याची माहिती वरिष्ठांना देण्यात येईल.- सूर्यकांत पाटील, तहसीलदार मोहाडी.