शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव

By admin | Updated: June 10, 2014 23:54 IST

सानगडी (डोंगरगाव) विद्युत वितरण केंद्रातून परिसरातील २४ गावांना वीज पुरवठा केला जातो. या केंद्रात १ कनिष्ठ अभियंता, १ लाईनमन व ४ सहाय्यक लाईनमन आहेत. या केंद्रात केवळ सहा कर्मचारी

सासरा : सानगडी (डोंगरगाव) विद्युत वितरण केंद्रातून परिसरातील २४ गावांना वीज पुरवठा केला जातो. या केंद्रात १ कनिष्ठ अभियंता, १ लाईनमन व ४ सहाय्यक लाईनमन आहेत. या केंद्रात केवळ सहा कर्मचारी कार्यरत असल्याने २४ गावांना सेवा पुरविण्यास त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. दोन वर्षापूर्वीपासून येथील वितरण कार्यालयात अपेक्षीत कर्मचाऱ्यांच अभाव आहे. परिणामी शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडत आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या पूर्ततेसाठी अनेकदा मागणी करण्यात आली आहे. परंतु दोन वर्ष लोटूनसुद्धा विद्युत वितरण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.या कार्यालयांतर्गत अधिकृत कर्मचारी सेवानिवृत्त तसेच बदली होऊन गेलेले आहेत. पण त्यांच्याऐवजी नवीन कर्मचारी दाखल झाल्याचे दिसून येत नाही. विद्युत वितरण विभागाच्या गलथान कारभाराला येथील नागरिक कंटाळल्ययाचे दिसत आहेत. येथील वीज वितरण कार्यालयाअंतर्गत सासरा हेडक्वॉर्टर्समध्ये एकूण सहा गावे आहेत. यापूर्वी या हेडक्वार्टरमध्ये संजय हटवार व सहाय्यक म्हणून सपाटे कार्यरत होते. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले. याठिकाणी प्रतिनियुक्तीवर तुळशीराम बनकर सहाय्यक लाईनमन म्हणून रुजू झाले. दोन कर्मचाऱ्यांऐवजी एकच कर्मचाऱ्याला प्रतिनियुक्ती देण्यात आली. या हेडक्वॉर्टर्स मध्ये हजारोच्या संख्येत पंप कनेक्शन व हजारो घरगुती कनेक्शन आहेत. एक कर्मचाऱ्याला सहा गावाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या हेडक्वॉर्टर्समध्ये कार्यरत सहाय्यक लाईनमन तुळशीराम बनकर जीव मुठीत घेऊन सहा गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना सुरळीत सेवा देत आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे असे असले तरी पुन्हा अधिकृत एका कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. सानगडी वीज वितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता गेडाम, लाईनमन बादशहा, सहाय्यक लाईनमन म्हणून तुळशीराम बनकर, पशिने, सोरदे, टिचकुले असे केवळ सहा कर्र्मचारी कार्र्यरत असून विद्युत सेवा देत असतानी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निरुपायाने सर्व अडचणींवर मात करावी लागत आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेविषयी वर्तमानपत्रातून, निवेदनातून वितरण विभागाला कळविण्यात आले आहे, दोन वर्षापासून वितरण विभागाची उदासीनता येथील जनतेला अनुभवायला मिळत आहे. विद्युत वितरण विभागाच्या दिरंगाईविरूद्ध येथील जनता आवाज उठविणार असल्याचे चित्र दिसत आहे.(वार्ताहर)