शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा अभाव, किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 13, 2015 00:36 IST

पावसाअभावी पवनी तालुक्यातील धान व सोयाबीन पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

आसगाव (चौ.) : पावसाअभावी पवनी तालुक्यातील धान व सोयाबीन पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने व मेहनतीने १५० ते २०० रुपये मजुरी देवून मागेपुढे न पाहता मागील महिन्यात पाऊस कमी पडला असला तरी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी इंजिन लावून जमेल त्या साधनाने शेतात पाणी सोडून मोठ्या मेहनतीने रोवणी केली.शेतकरी हिरवीगार स्वप्न उराशी बाळगून असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे व वातावरणात उष्णता निर्माण झाल्यामुळे पिकाच्या वाढीचा जोर नाहीसा होत आहे. भातपिकावर व सोयाबीन पिकावर निरनिराळ्या प्रकारचे रोग येत आहेत.करपा, कडा करपा, बेड्डी, खोडकिडा, मावा, तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन या पिकांची वातावरण मोकळे असल्यामुळे जोमाने वाढ झाली होती. परंतु या पिकावर पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणारी अळी तसेच या पिकावर मर रोग आल्यामुळे झाडे आपोआपच पिवळी पडलेली आहेत. अशातच रासायनिक खते व औषधींच्या किमती वाढतच आहेत. कृषी पिकावर औषधी उपयोगी फवारणाऱ्या औषधांच्या महागड्या औषधी बाजारामध्ये येत आहेत. त्यामुळे शेतकरी भांबावल्या स्थितीतही महागडी किटकनाशके फवारणीसाठी कर्ज काढून, दागीने गहान ठेवून फवारणी व खतासाठी व पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वाट्टेल ते उपाय करत आहेत.ऐन तोंडात अन्नाचा घास निसर्ग हिसकावून घेण्याचा परिस्थितीत उभा आहे. पिकावर अनेक प्रकारचे रोग आले असताना मात्र तालुका कृषी कार्यालयात कीड रोगावर प्रतिबंध करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा औषध पुरवठा उपलब्ध नाही. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मदतही नाही. या अगोदरच्या सरकारच्या काळात मात्र शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनेक प्रकारच्या किटकनाशकाचा पुरवठा अनुदानावर मिळत होता. आता मात्र कृषी कार्यालय नावाचेच राहिलेले आहे. विद्युत मंडळ तारक की मारक या गंभीर परिस्थितीत विद्युत मंडळाचे पॉवर स्टेशन १३२ केव्ही पॉवरचे आहे. पवनी व लाखांदूर तालुक्यात विहिरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे चौरास भाग म्हणून हमखास भातपिक देणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु दररोज शेतीला फक्त २४ तासापैकी १० तासच विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतीला पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.त्यामुळे शेतकरी पुर्णत: हताश झाला आहे. (वार्ताहर)