शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

धानविक्रीपोटी लाखो रुपये थकीत

By admin | Updated: May 25, 2015 00:42 IST

आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकीत आहेत.

बंद : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीसाकोली : आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकीत आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांच्या गरजा वाढल्या. अशात धान खरेदी केंद्रातील थकबाकी कधी मिळेल, याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.महाराष्ट्र को-आॅप. मार्केटींग फेडरेशनच्या सब एजन्ट म्हणून येथील श्रीराम भात गिरणी हमीभाव धान खरेदी केंद्र चालविते. २०१४-१५ या वर्षातील खरेदी हंगामात चार कोटी ११ लाख ३० हजार ३४४ रुपये किंमतीच्या धानाची खरेदी केली. सध्या उन्हाळी धानाची खरेदी सुरु आहे. मागील महिन्यात सुमारे ३० हजार रुपये किंमतीच्या धानाची खरेदी केली. सध्या उन्हाळी धानाची खरेदी सुरु आहे. मागील महिन्यात सुमारे ३० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्याचे ६८ लाख रुपये शेतकऱ्यांना येणे आहे. सर्वसाधारण प्रतीचे धान १,३६० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरु आहे.श्रीराम सहकारी भातगिरणी येथे दररोज ७०० ते ८०० क्विंटल धानाची आवक सुरु आहे. यातील जवळपास ५०० क्ंिवटल धानाचे रोज मोजमाप होते. त्यामुळे रोज येणाऱ्या शेतकऱ्यांना मोजणीसाठी दुसऱ्या व तिसऱ्या दिवसांपर्यंत थांबून राहावे लागत आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी हेच एकमेव आधारभूत धान खरेदी केंद्र असल्यामुळे येथे शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यातच निकटवर्तीय व कुटूंबातील सदस्यांच्या लग्नसमारंभासाठी जाण्याचीही लगबग सुरु आहे. रोजची आवक वाढत असल्याने खरेदी केंद्राच्या आवारात धानाच्या पोत्यांचे ढीग लागले आहेत. विक्रीसाठी आणलेल्या धानाचे लवकर मोजमाप व्हावे, या अपेक्षेने येणाऱ्या शेतकऱ्यांना येथे ताटकळत राहावे लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी एकोडी व पळसगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुर करावे. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांची आतापर्यंत ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे. (तालुका प्रतिनिधी)