शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी

By admin | Updated: October 3, 2016 00:28 IST

परतीच्या पावसाचा तडाखा सुरु असल्याने हलक्या प्रतीच्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे.

उत्पादनावर परिणाम : २० टक्के क्षेत्र पडीत, पाऊस तारणार की मारणार?भंडारा : परतीच्या पावसाचा तडाखा सुरु असल्याने हलक्या प्रतीच्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. याचा उत्पन्नावर परिणाम होत असून शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामात निसर्गाच्या कोपामुळे २० टक्के क्षेत्र पडीत असून जिल्हा प्रशासनाने नुकतीच घोषित केलेल्या खरीपाची नजरअंदाज पैसेवारी ७२ पैसे काढली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. सिंचनाच्या सहाय्याने कसेबसे पिक लागवड केले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. या हजेरीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी आशा होती. मात्र आॅगस्ट महिन्यात उन्हाळ्यासारखा तापल्याने पिके करपली. त्यानंतर परतीच्या पावसाने सुरुवात केली. मात्र हा पाऊस हलक्या प्रतीच्या धानासाठी कर्दनकाळ ठरत आहे. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आहे.पालांदूर : धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्याला मागील १५ दिवसापासून अस्मानी संकटाने घेरले आहे. हलके व मध्यम धान कापणीला आले असून काही ठिकाणी धान सडत आहे. काही ठिकाणी हवा व पाऊसाचा जोरदार झोतामुळे धानपिक भुईसपाट झाले आहे. सततच्या पावसाने बांध्यातील पाणी निघत नसल्याने पडलेल्या धानाला सडका वास येत आहे. शेतकरी पडलेला धान उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मागील ३ वर्षाचा ओला आणि कोरडा दुष्काळ डोक्यावर घेत हिमतीने नव्या हंगामाला शेतकरी नव्या उर्जेने तयार होतो. मात्र निसर्ग लहरी झाल्याने अनियमितपणा वाढला आहे. जुन महिन्यात पावसाची अत्यल्प हजेरीने पेरणी अर्धी व लांबली. जुलै महिन्यात समाधानकारक पण ‘कही खुशी कही गम’ करीत हजेरी लावली. धान कमी पण निंदण जास्त अशी स्थिती संप्टेंबर महिन्याच्या पहिला व दुसऱ्या हप्त्यात पाहायला मिळाली. महिन्याअखेरपर्यंत पावसाची जोरदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला. कापणीच्या धानाला तुळतुळा, अळी कसा जेमतेम एखादेवेळेस अनुदानावर औषधी पुरवितात. ही नियमित करुन खर्च कमी करण्याची आवश्यक आहे. करपा रोगात नविन प्रश्न तयार झाला असून निसवलेली लोंबी अक्षरश: पांढरी होतात. दाणे भरतच नाही बऱ्याच शेतात गळ्याजवळील दाणे पोचटच असतात, असे रोग नविन असल्याने सामान्य शेतकऱ्याला कळणारे नसल्याने नुकसान होत आहे.तालुक्यातील चुलबंधच्या खोऱ्यातील धान शेती पावसाने प्रभावित झाली असून लोहारा, नरव्हा, मऱ्हेगाव, वाकल, खराशी, पाथरी शिवारात धान कापले असून सततच्या पावसाने सडत आहेत. पाणी बांध्यातून पूर्णपणे निघत नसल्याने मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभी झालेली आहे. पंजाबराव कृषी विद्यापिठअंर्गत साकोली कार्यालयातून माहिती दिली जात आहे. (वार्ताहर)यंदाही उत्पन्न बुडण्याची भीतीपालोरा (चौ.) : सध्याला हलके धानाचे पिक कापणीवर आले आहेत. मात्र पावसामुळे चौरास भागातील हलक्या धान पिकाची मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. येणाऱ्या पावसाने उच्च धान पिकाला फायदा होत असला तरी हलक्या प्रतीचे धान मातीमोल होत आहेत. शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिरावल्यामुळे पीक वाचविण्याकरिता शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पवनी तालुक्यातील पालोरा हा परिसर चौरास भाग म्हणून प्रसिद्ध आहे. धान पिक हा शेतकऱ्यांचा मुख्य पीक आहे. सतत शेतकरी दुष्काळाच्या छायेत जीवन कंठीत होता. यावर्षी वरूण राजाच्या कृपेने वेळोवेळी पावसाचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र धान पिक चांगल्या प्रमाणात असून यावर्षी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात दररोज कमी जास्त पाऊस येत असल्यामुळे हलके धान पिक धोक्यात आले आहे. अनेक शेतातील धान पडल्यामुळे मातीमोल झाले आहेत. (वार्ताहर)