शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

सुविधांअभावी रुग्णसेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

कोंढा येथील आरोग्य केंद्र अनेक पुरस्कार प्राप्त केंद्र आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद मंजूर आहेत. ३१ ऑक्टोबरला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर लेपसे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या केंद्रात एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल बोरकर सध्या कार्यरत आहेत. त्यांच्यावर सर्व जबाबदारी आली आहे.

ठळक मुद्देकोंढा प्राथमिक आरोग्य केंद्र : डॉक्टरांचेही रिक्त पद तातडीने भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. अ‍ॅब्युलन्स नेहमी आजारी यासह सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील रुग्णसेवा कोलमडली आहे.कोंढा येथील आरोग्य केंद्र अनेक पुरस्कार प्राप्त केंद्र आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद मंजूर आहेत. ३१ ऑक्टोबरला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर लेपसे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या केंद्रात एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल बोरकर सध्या कार्यरत आहेत. त्यांच्यावर सर्व जबाबदारी आली आहे.जवळपास ५६ गावाच्या आरोग्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रावर आहे. येथे दररोज ओपीडीमध्ये उपचारासाठी १०० ते २०० रुग्ण येथेत येत असतात. त्यांच्यावर उपचार करणे, एखादेवेळी आकस्मिक रुग्ण उपचारासाठी येथे अनेकदा येत असतात. आठ दिवसापूर्वी कोंढा येथे वॉर्ड क्रमांक २ व ३ मध्ये अतिसाराची लागण झाली. तेव्हा त्या रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले. अशावेळी या केंद्रात दुसरे वैद्यकीय अधिकाºयांचे रिक्त पद देणे गरजेचे आहे. तसेच या केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया गर्भवती महिलांवर उपचार व त्यांची प्रसूती येथे केली जाते. त्याचप्रमाणे लहान मुलांवर अनेक उपचार केले जात असते. येथे एक वैद्यकीय अधिकाºयांचे रिक्त पद भरणे आवश्यक आहे. आरोग्य कर्मचाºयांची रिक्त पदे आरोग्य केंद्रात कारकून, आरोग्य सेवक, परिचारिका अशी अनेक पदे रिक्त आहेत. त्यांचा भार कर्मचाऱ्यांवर येत आहे. या केंद्रातील अ‍ॅम्बुलन्स अनेक महिन्यापासून आजारी आहे. त्यामुळे रुग्णांना भंडारा, नागपूरला उपचारासाठी नेण्यास अडचण जात आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया तसेच प्रसूती झालेल्या महिला रुग्णांना घरी सोडण्यास अडचण जात आहे. येथे नवीन रुग्णवाहिका या केंद्रास देणे आवश्यक आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार नरेंद्र भोंडेकर, पवनी तालुका शिवसेनाप्रमुख विजय काटेखाये यांनी आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका व येथे औषधीचा पुरवठा करण्याचे निवेदन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिले होते. तसेच गावातील अनेक नागरिकांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर यांना या समस्येकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त एक वैद्यकीय अधिकारी, नवीन रुग्णवाहिका व औषधी पुरवठा त्वरीत करण्याची मागणी कोंढा व परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींनीकडे केली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल