शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याने धानाचे विक्री करीता पुढाकार घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देधानाची खरेदी झाली बंद : धानाची नासाडी, पोत्यांच्या सुरक्षिततेसाठी ताडपत्रीचे आच्छादन

  लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदानासह अनेक सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. धान खरेदी केंद्राचा  श्रीगणेशा अद्याप करण्यात आलेला नाही. केंद्र सुरू होण्याआधीच केंद्रावर विक्रीसाठी धानाची पोती पोहचली असल्याने अवकाळी पावसाचा फटका पोत्याना बसला आहे.  धान आणि पोत्यांना खुद्द शेतकऱ्यांनाच सुरक्षा कवच देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याने धानाचे विक्री करीता पुढाकार घेण्यात येत आहे. या परिसरात बपेरा, देवसरा, बिनाखी, चुल्हाड, सिंदपुरी, टेमनी, सुकली नकुल, सिहोरा, वाहनी, हरदोली, करकापूर, पिपरी चुनही, गोंडीटोला, दावेझरी, गोंदेखारी गावात धानाची खरेदी केंद्रावर करण्यात येत आहे. धान साठवणूक करण्यासाठी खाजगी गोडाऊन घेण्यात येत आहेत. परिसरात असणारे गोडाऊनमधील गेल्या वर्षातील धानाचे पोती रिकामे करण्यात आली आहेत. धान खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांची गोची होत आहे. दरम्यान धान खरेदी केंद्र सुरु होणार असल्याच्या  अपेक्षेने शेतकऱ्यांनी धानाचे पोती केंद्रावर आणले आहेत. धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचे आधी गोडाऊन रिकामे केल्याने एक चांगला संदेश शेतकऱ्यांत गेला आहे. धान खरेदी करताना गोडाऊनची समस्या निर्माण होणार नाही. धान खरेदी नंतर पोती गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवली  जातील. परंतु सध्या गोडाऊन बाहेर शेतकऱ्यांनी धानाचे पोती उघड्यावर ठेवली आहेत. या पोत्यांना सुरक्षित करण्यासाठी ताडपत्रीचे आच्छादन दिले आहेत.येथे सुरक्षा करण्यासाठी चौकीदार नाहीत. परिसरात खरेदी केंद्रावरून धान पोती चोरी होण्याचे घटना आजवर घडल्या नाहीत. यामुळे केंद्र संचालक बेफिकीर राहत आहेत. या पोत्यांना  जनावरांची भीती आहे. कीटक पोत्यातील धानाची नासाडी करीत आहेत. नुकसानग्रस्त धानाचा फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. याशिवाय धान खरेदी करताना घट काढली जात आहे. यातही शेतकऱ्यांची गोची केली जात आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी विलंब होत असल्याने व्यापाऱ्यांना फायदा होत   आहे.  सिहोरा परिसरातील भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

केंद्रावर मनुष्यबळाचा अभाव   धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुटालूट होत असल्याचे वारंवार आरोप होत आहेत. अतिरिक्त २ ते ३ किलो धानाची घट म्हणून कापले जात आहेत. यात रिकामे पोत्याचा वजन जोडले जात आहे. यावरून शेतकऱ्यांनी धान आणायचे कसे ? केंद्रावर धानाचे पोती उचल करणाऱ्या हमालांना दरानुसार राशी दिली जात आहे. असे असताना पुन्हा शेतकऱ्यांकडून हमाली वसुल करण्याचे आरोप होत आहेत. धान खरेदी केंद्रावर पारदर्शकता ठेवली पाहिजे. यात शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे. यंदा शेतकरी चौफेर संकटात सापडला आहे. पूर, परतीचा पाऊस, मावा तुडतुडा, अवकाळी पाऊस, एकरी ३ पोते धानाचे उत्पादन झाल्याने शासनाने  शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याची गरज आहे.

चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात एकही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. वाहनी केंद्रावर धान पोती उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. यामुळे तात्काळ धान खरेदी सुरु करण्यात यावी.- प्रल्हाद आगाशे, सरपंच, करकापूर

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड