शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वनसंवर्धनासाठी सुविधांचा अभाव

By admin | Updated: January 17, 2015 01:16 IST

वनविकास महामंडळ, नागझिरा अभयारण्य परिसरात कोट्यावधी रूपयाच्या वनसंपदेची तस्करी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.

साकोली : वनविकास महामंडळ, नागझिरा अभयारण्य परिसरात कोट्यावधी रूपयाच्या वनसंपदेची तस्करी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र वनांचे संरक्षण करण्यासाठी वनकर्मचारी आणि वनअधिकारी यांच्याकडे पुरेशा सुविधा नसल्यामुळे तस्करांवर आळा घालण्यात त्यांना पुरेसे यश आलेले नाही. वनविकास महामंडळ व नागझिरा अभयारण्य परिसरातील पिटेझरी, रेंगेपार, घानोड, खांबा, आमगाव व सातलवाडा या परिसरातील गावामध्ये २०० ते २५० हातआऱ्यांनी सागवनाची कटाई केली जाते. या वनतस्करांच्या व्यवसायात परिसरातील ४०० ते ५०० लोक गुंतलेले आहेत. त्यांच्यात कामाची वाटणीही झाली आहे. जंगलात जाऊन सागवनाची लाकडे कापून आणणाऱ्यांच्या टोळ्या आहेत. या परिसरातील वन कम्पार्टमेंटमध्ये जावून लाकडे तोडून खांद्यावर व डोक्यावर वाहून नेणे सुरू आहे. गावात आल्यानंतर लाकूड कंत्राटदार गोलाई व लांबीनुसार त्या लाकडाचे दर ठरवितात. अवैध कटाई करणारे कंत्राटदार या लाकडाची खरेदी करून मजुरांकडून कामे करुन घेतात. त्यांना २०० ते हजार रूपयापर्यंत कामानुसार मजुरी देण्यात येते. मागणीनुसार लाकडे कापली जातात. साकोली आणि तालुक्यातील लाकडांची मागणी नागपूर, गोंदिया येथे आहे. खरेदीदार गरजेनुसार संबंधित कंत्राटदाराला अग्रीम देऊन जातात. मागणीनुसार कटाई केल्यानंतर ट्रक, आॅटो, सुमो, व्हॅनने हे लाकूड पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र याची माहिती वनविभागाला कशी कळत नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. साकोली परिसरात दोनशेच्यावर हातआरीने लाकूड कटाई करणारे कारागीर आहेत. दररोज या परिसरातून लाखो रूपयांच्या वनसंपदेची तस्करी सुरू आहे. यात सागवन तस्करीचे प्रमाण अधिक आहे. साकोली परिसरात हा व्यवसाय मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. या व्यवसायात गुंतलेले मजूर पाच सहा तासात पाचशे ते हजार रूपयांची कमाई करतात. वनकर्मचारी जीवाच्या भीतीपोटी व शस्त्राअभावी कारवाई करण्यास धजावत नाही. गडचिरोली जिल्ह्यात लाकूड तस्करांवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाने शस्त्रे पुरविली आहेत. त्याच धर्तीवर या ठिकाणी शस्त्रे देण्याची गरज आहे.जंगलात जावून अवैध कटाई करणारे ४० ते ५० मजूर समुहाने असतात. त्यांच्याकडे शस्त्रे असतात. वनकर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कारवाई करण्यासाठी ते घाबरतात. परिणामी कोट्यावधीची वनसंपत्ती नष्ट होत आहे. भविष्यात ही स्थिती राहिली तर वनविकास महामंडळाच्या अधिकार क्षेत्रातील जंगल व त्याला लागून असलेले जंगले भूईसपाट होण्यासाठी वेळ लागणार नाही. (तालुका प्रतिनिधी)