शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

सकोलीच्या शेल्टर होममध्ये मजुराचा मृत्यू, चंद्रपूरहून मध्यप्रदेशात जात होते पायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 11:37 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही येथून आपल्या परिवारासह जात असताना शेल्टर होममध्ये मुक्कामी होता.

साकोली (भंडारा) :  येथील शेल्टर होममध्ये मुक्कामी असलेल्या मध्यप्रदेशातील एका मजुराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही येथून आपल्या परिवारासह जात असताना शेल्टर होममध्ये मुक्कामी होता.

धरम दुबे पाचे (५०) रा. अत्री जि. बालाघाट, मध्यप्रदेश असे मृताचे नाव आहे. गुरुवारी दुपारी त्याला परिवारासह साकोलीच्या अपना घर या शेल्टर होममध्ये आणण्यात अाले. त्यावेळी त्याच्यासह सर्वांची वैद्यकिय तपासणी कारण्यात आली. तेव्हा तो तंदुरूस्त होता. रात्री भोजन करुन तो झोपी गेला. शुक्रवारी सकाळी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब शेल्टर. होमच्या प्रमुखाला सांगितली. त्यांनी डाॅक्टरांना पाचारण केले, तेव्हा डाॅक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे कळू शकले नाही.