शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजिवनी योजना शेतकऱ्यांसाठी ‘दिवास्वप्न’!

By admin | Updated: August 4, 2014 23:34 IST

राज्य शासनाने नव्यानेच अंमलात आणलेली कृषी संजिवनी योजना कागदोपत्री असून यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ती दिवास्वप्न ठरल्याचा आरोप भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकरी वंचित : महावितरणची वीज कपात सुरूभंडारा : राज्य शासनाने नव्यानेच अंमलात आणलेली कृषी संजिवनी योजना कागदोपत्री असून यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ती दिवास्वप्न ठरल्याचा आरोप भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाने पाच वर्षाच्या शेवटच्या कार्यकाळात योजनांचा पाऊस पाडून मतदारांना प्रलोभणे देणे सुरू केले आहे. यातील अनेक योजना सुरू झाल्या असून काहींना त्यांचा फायदा झाला तर अजूनही काही जण केवळ आशेवर आहेत. शेतकऱ्यांकडील कृषीपंपाच्या माध्यमातून शेती पिकविण्यात येते. अशा या शेतकऱ्यांकडे नापिकी किंवा कर्जबाजारीपणामुळे कृषीपंपाची विज बिले थकीत आहेत. अशा कृषी पंपधारकांना विज बिलाच्या थकीत रक्कमेचा बोझा कमी करण्याकरीता शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ राबविण्याचा निर्णय घेवून त्यात थकविलेल्या विज बिलांवर ५० टक्के माफी, कृषी पंप ग्राहकांना देण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेतला आहे. ३१ मार्च २०१४ पुर्वीच्या थकबाकीतील मुळ रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ५० टक्के मुळ रक्कम व पुर्ण थकबाकीच्या रक्कमेवरील पुर्ण व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. नियमित विज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन त्रेमासिक बिलात ५० टक्के सुट देण्यात येणार आहे. कृषी संजीवनी योजनेसाठी शासनाने प्रसार व प्रचारावर लाखो रूपये खर्च केले असून शेतकऱ्यांना मात्र विज बिलात कुठलीही सुट मिळणार नसल्याचे आता उघडकीस येत आहे. वरठी येथील परसराम पतिराम कुथे यांचा कृषीपंपाचा ग्राहक क्रमांक ४३०६७१४००३९३ हा आहे. त्यांच्याकडे आजमितीस ४४ हजार ९९० रूपये थकबाकी आहे. राज्य शासनाने घोषित केलेल्या कृषी संजीवनी योजने अंतर्गत कुथे यांना मात्र लाभ मिळाला नाही. याबाबत त्यांनी महावितरण कार्यालयाकडे शासनाच्या योजनेसह विणवणी केली. मात्र त्यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळाल्याच्या आरोप कुथे यांनी केला आहे.राज्य शासनाने घोषित केलेल्या योजने नुसार ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के, ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत २० टक्के व ३१ आॅक्टोंबर २०१४ पर्यंत कमीत कमी १० टक्के किंवा उरलेली रक्कम भरण्याची सुवीधा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र शासनाने सदर शासन निर्णयात कोणते थकबाकीदार कृषीपंप विज ग्राहक हा उल्लेख केला नसल्याने अनेक थकबाकीदार कृषीपंपधारक संभ्रमात पडले आहेत. कृषीपंपाचे थकबाकी महावितरण कडे प्राप्त न झाल्याने त्यांनी अनेक कृषी पंपधारकांचा विज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करून राज्य शासनाने जाहिरातीवर करीत असलेल्या कृषी संजीवनीच्या खर्चाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने या योजनेत कृषी पंपधारकांचा समावेश करावा, व त्यांना लाभ द्यावा, अशी मागणी कुथे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)