शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाराचे ज्ञान दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविले पाहिजे

By admin | Updated: November 22, 2015 00:24 IST

माहिती अधिकार कायद्याचे ज्ञान समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे, ...

माहिती आयुक्तांचे आवाहन : अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांची बैठकभंडारा : माहिती अधिकार कायद्याचे ज्ञान समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सभागृहात माहिती अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठक घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे उपस्थित होते. यावेळी गायकवाड म्हणाले, ब्रिटिश राजवटीपासून शासकीय माहिती जनतेपर्यंत खुलेपणाने पोचत नव्हते. स्वातंत्र्यानंतर शासकीय व प्रशासकीय माहिती जनतेला मागण्याचा अधिकार प्रथमच या कायद्याने दिला आहे. महाराष्ट्र राज्यात हा कायदा २००२ पासून अंमलात आला. शासन जे निर्णय घेते त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार या निमित्ताने जनतेला मिळाला आहे. माहितीचा अधिकार हा कायदा पारदर्शकतेशी निगडीत आहे. जे महत्त्वाचे कायदे आहेत त्याची माहिती सर्वसामान्य व दुर्बल घटकांना व्हावी, यासाठी बार्टी आणि समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात माहिती अधिकार कार्यशाळेसाठी सर्वाचे अभिनंदन केले. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत कायद्याचे ज्ञान अशा कार्यशाळेच्या माध्यमातून पोहोचविणे आवश्यक आहे. संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी यांनी केले. प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे यांनी केले. बैठकीला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)