शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

किटाडीत वर्ग सात अन् शिक्षक चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:30 IST

गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्हा परिषद शाळेला पदवीधर शिक्षक द्या

लोकमत न्यूज नेटवर्ककिटाडी: लाखनी तालुक्यातील किटाडी येथील जिल्हा परिषद शाळेलाही जवळपास आठ-दहा महिन्यांपासून पदवीधर विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्ग सात आणि शिक्षक चार अशी विदारक स्थिती किटाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आहे. शाळेत पुन्हा तीन शिक्षकांची गरज आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, पालक व गावकऱ्यांकडून शाळेत तत्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची गटशिक्षणाधिकाऱ्यांना मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

किटाडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत एकूण २०७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सद्यःस्थितीतशाळेत एकण चारच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सातही वर्गाच्या अध्यापनाचा भार आता केवळ चार शिक्षकांवरच आला आहे. सात वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवताना चार शिक्षकांची दमछाक होत आहे. तसेच शाळेचे कामकाजही कार्यरत असलेल्या चार शिक्षकांनाच करावे लागत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नकसान लक्षात घेता आता तरी तातडीने शाळेला पदवीधर शिक्षक द्या, या मागणीचे निवेदन सरपंच कल्पेश कुळमते, उपसरपंच पंकज घाटबांधे, पोलिस पाटील प्रशांत धुर्वे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुंजीलाल चौधरी, शिक्षणतज्ज्ञ जागेश्वर निखारे यांच्यासह पालकांकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 

"आपल्या स्तरावरून शिक्षकांच्या रिक्त जागांविषयी जिल्हा परिषदेला कळविले आहे. जिल्हा परिषदेकडून शिक्षकांची पूर्तता होताच किटाडी जिल्हा परिषद शाळेत तातडीने शिक्षकांची नेमणूक करण्यात येईल."- सुभाष बावनकुळे, गटशिक्षणाधिकारी, पं.स., लाखनी.

"किटाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची वानवा आहे. चार शिक्षकांना सातही वर्गाना सांभाळावे लागत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होणार तरी कशी? असा प्रश्न पडतो. शिक्षकांअभावी शैक्षणिक कार्यात अडचण निर्माण होत आहे. याबाबत निवेदनाच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही."- कुंजीलाल चौधरी, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, किटाडी. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाbhandara-acभंडारा