शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

किसनपूर मूलभूत सुविधांपासून वंचित

By admin | Updated: August 12, 2014 23:36 IST

करडी(पालोरा): कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी न्यू नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या सिमेवर असलेल्या नक्षलप्रभावित किसनपूर विकासापासून कोसो दूर आहे.

करडी(पालोरा) : करडी(पालोरा): कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी न्यू नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या सिमेवर असलेल्या नक्षलप्रभावित किसनपूर विकासापासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंंतरही गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.व्याघ्र प्रकल्पामुळे जंगलावर आधारित व्यवसाय बंद पडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.कोका जंगल टेकड्यांच्या घनदाट अभयारण्याशेजारी फुटक्या तलावाच्या जवळ मोहाडी तालुक्यातील किसनपूर गाव आहे.सध्या गावाच्या सभोवतालचा परिसर न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारित झोनमध्ये मोडतो. गावाच्या शेजारीच गोंदिया जिल्ह्याच्या सीमा सुरु होतात. स्वातंत्र्याच्या काही वर्षापर्यंत येथे ५०-६० घरांची वस्ती होती. आज केवळ सहा कुटुंब वास्तव्याला आहेत. जंगलातील लाकडे, काड्यामोळ्या आणून शेजारील गावात जाऊन विकणे, त्याचबरोबर झुडपी जंगलाच्या जागेत शेती करुन येथील नागरिक आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवितात. अगोदर येथे वनपरिक्षेत्रधिकाऱ्याचे कार्यालय सुद्धा होते. मात्र विद्युत, शिक्षण व रस्त्याच्या असुविधेमुळे येथील लोकांनी ३ किमी अंतरावरील मोकळ्याजागेत वसाहत तयार केली. नागरिक गाव सोडून जाऊ लागल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने रिकामी केली आहेत.मोठ्या गावात स्थलांतरित झाले. गावात केवळ ६ कुटुंब वास्तव्याला आहेत. प्राथमिक शिक्षणासाठी येथील मुलांना जंगलातून ३ किमीचे अंतर पार करुन स्थलांतरीत गावात जावे लागते. तर ८ ते १० वर्गासाठी ७ किमी अंतरावरील गावाकडे पोहोचावे लागते. यामुळे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. गावात शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे. निरक्षणतेबरोबर कुपोषणाचे प्रमाण सुद्धा बरेच आहे.गावात जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात अनेक कठीनाईचा सामना करावा लागतो. आठवडी बाजारासाठी पालोरा गावी तर दैनंदिन व्यवहारासाठी करडी गावाशी संपर्क साधताना परिश्रम घ्यावे लागतात. किसनपूर गाव जांभोरा गटग्रामपंचायत अंतर्गत मोडत असले तरी येथील नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधीत्व मिळत नाही. गावात त्यामुळे शासकीय योजनांचा अभाव दिसून येतो. सन १९९३ ला गावात नक्षलवादी येऊन गेल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे. परंतु गाव विकासासाठी ठोस उपाययोजना आखल्या गेल्या नाहीत. दोन वर्षाअगोदर गावात विद्युतची सोय नव्हती. लोकप्रतिनिधी व विद्युत विभागाच्या प्रयत्नामुळे गावात विद्युत पोल पोहचून डीपी लावली गेली. अंधाराचे साम्राज्य असलेल्या गावात प्रथमच प्र्रकाश पडला. आजही गाव पक्का रस्ता व शिक्षणाच्या सोयींपासून वंचित आहे. (वार्ताहर)