शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खुटसावरीवासीयांची धूरमुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:28 IST

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जंगल तोड करुन सरपणासाठी जाण्याची वेळ महिलांवर येवू नये. त्यांची पायपीट होऊ नये. घरातील धूर प्रदूषण टाळण्यासाठी भंडारा तालुक्यातील खुटसावरी वासीयांनी गाव धूरमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. ध्येय पुर्ततेसाठी गॅस कंपनीचे अधिकारी, गॅस एंजसीचे वितरक, कर्मचारी, ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे.महिलांना डोळ्याच्या आजारांना ...

ठळक मुद्दे१०० रुपयात गॅस जोडणी : ध्येयासाठी अधिकारी, कर्मचारी, ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांची धावपळ

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जंगल तोड करुन सरपणासाठी जाण्याची वेळ महिलांवर येवू नये. त्यांची पायपीट होऊ नये. घरातील धूर प्रदूषण टाळण्यासाठी भंडारा तालुक्यातील खुटसावरी वासीयांनी गाव धूरमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. ध्येय पुर्ततेसाठी गॅस कंपनीचे अधिकारी, गॅस एंजसीचे वितरक, कर्मचारी, ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे.महिलांना डोळ्याच्या आजारांना सामोरे जावे लागते. महिलांच्या जीवनात आत्मसन्मान जागविण्यासाठी विविध योजना आहेत. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला गॅस जोडणी योजना कार्यान्वित करण्यात आली. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांची पायपीट होवू नये. घरातील धूर प्रदूषण टाळण्यासाठी गॅस जोडणी महत्वाची आहे. ज्या घरात गॅस जोडणी पूर्वीच देण्यात आली, त्या घरी दुसºयांदा गॅस जोडणी देण्याचे कटाक्षाने टाळून गरजूनाच लाभ देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. खुटसावरी गावाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत निवड करण्यात आली आहे. या गावाची लोकसंख्या हजाराच्यावर आहे. मात्र गावात केवळ ८४ कुटूंबांकडे गॅस जोडणी आहे.गावातील प्रत्येक कुटूंबाकडे गॅस जोडणी व्हावी, असा उद्देश शासनाचा आहे. धूर मुक्तीतून महिलांची सुटका व्हावी, याकरीता रविवारला गावात धावपळ दिसून आली. गावातील १० सुशिक्षिीत बेरोजगारांचा एक गट तयार करुन त्या गटांनी गावातील सर्व्हे केला. गाव धूर मुक्त करण्यासाठी आज सकाळपासून गावात अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ एकत्रीत आले होते. ग्रास्थांच्या शंकाकुशंकावर त्या अधिकाऱ्यांनी निसंकोचपणे उत्तरे दिलीत.ग्रामपंचायत पदाधिकारी सरसावलेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत खुटसावरी गावाची निवड करण्यात आली आहे. त्या निमित्ताने आखून दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी कंबर कसली आहे. गावात जनजागृती करुन शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येकांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. याकामी खुटसावरीचे सरपंच विजय वासनिक, उपसरपंच सुरेश उईके, ग्रामसेवक एस.एस. हातझाडे, सदस्य छाया वाहणे, प्रियंका टेंभूर्णे, ममिता हारगुळे, सरीता मडावी, डाटा आॅपरेटर विनोद पोटवार, रोजगार सेवक कुणाल गेडाम, शिपाई रुस्तम टेंभूर्णे यांच्यासह ग्रामस्थ प्रयत्नरत आहेत.ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत निवड झालेल्या खुटसावरी गावातील गरजू महिलांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उज्ज्वला योजनेतंर्गत केवळ १०० रुपयांमध्ये गॅस जोडणी देऊन धूरमुक्त गाव करण्याचा मानस आहे. त्याकरीता गावाला भेट देऊन जनजागृती करण्यात आली. उज्ज्वला योजनेसाठी सात प्रवर्ग निर्धारीत केलेले आहेत. त्यानुसार लागण्यात येणाºया कागदपत्रांची पुर्तता होताच गावात लवकरच गॅस जोडणीचे वितरण करण्यात येईल.- डी.एफ.कोचे,संचालक, कोचे गॅस सर्व्हीस भंडारा.