शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खुशाल बोपचेंची माघार, राष्ट्रहित की स्वहित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:51 IST

'आपण कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही' अशी राणाभीमदेवी थाटात नामांकन दाखल केल्यानंतर घोषणा करणारे भाजपाचे माजी खासदार खुशाल बोपचे यांनी निवडणुकीपूर्वीच शस्त्र खाली ठेवले. निवडणूक रिंगणातून माघार घेताना त्यांनी राष्ट्रहिताचा आधार घेतला असला तरी वरिष्ठांचा दबाव आणि स्वहितच असल्याचे मतदार संघात बोलले जात आहे.

ठळक मुद्देदबाव कुणाचा : रणांगणातच शस्त्र ठेवले खाली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : 'आपण कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही' अशी राणाभीमदेवी थाटात नामांकन दाखल केल्यानंतर घोषणा करणारे भाजपाचे माजी खासदार खुशाल बोपचे यांनी निवडणुकीपूर्वीच शस्त्र खाली ठेवले. निवडणूक रिंगणातून माघार घेताना त्यांनी राष्ट्रहिताचा आधार घेतला असला तरी वरिष्ठांचा दबाव आणि स्वहितच असल्याचे मतदार संघात बोलले जात आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवारीसाठी माजी खासदार खुशाल बोपचे यांनी जीवाचे रान केले. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना डावलत भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली. आमदार आणि खासदारकी भूषविलेल्या खुशाल बोपचे संतप्त झाले.नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यानंतर आपण कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी माघे घेणार नाही. वरिष्ठांनी कितीही दबाव आणला तरी आता माघार नाही, असे सांगितले. त्यांच्या या पावित्र्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली. खुशाल बोपचे यांचा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. ते पोवार समाजाचे नेते असून या समाजाची मते यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. त्यामुळेच भाजपाने त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरी बसविण्याचा प्रयत्न सुरू केला. राणाभीमदेवी थाटात घोषणा करणारे खुशाल बोपचे अवघ्या ७२ तासातच भाजपाच्या गोटात मिळसले.पत्रपरिषद घेवून राष्ट्रहितासाठी आता उमेदवारी मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याशी संपर्क साधला. त्यामुळेच आपण माघार घेतल्याचे सांगण्यासही ते विसरले नाही.संघर्षाचा वारसा असलेल्या बोपचेंनी उमेदवारी मागे घेताना राष्ट्रहिताचा 'पवित्र' हेतू पुढे केला असला तरी त्या मागच्या कारणांची आता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात खुलेआम चर्चा होत आहे. स्वहितासाठी बोपचेंनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. मुलाच्या राजकीय भविष्याचा विचार यामागे निश्चितच असावा.पोवार समाज कुणाच्या पाठीशीपोवार समाजाचे नेतृत्व करणारे खुशाल बोपचे यांनी रणांगणावरच शस्त्र खाली ठेवले. त्यामुळे आता पोवार समाज नेमका कोणत्या पक्षाच्या पाठीशी राहणार यावरही खल होत आहे. आपल्या समाजाच्या सक्षम उमेदवाराला भाजपाने डावलल्याने समाजात भाजपाविषयी प्रचंड नाराजी दिसत आहे. ती नाराजी मतदान यंत्रातून उतरण्याचे भीती आहे.