शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

खोप्यामधी खोपा सुगरणीचा खोपा...

By admin | Updated: September 1, 2016 00:50 IST

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे... बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या कवितेतील ओळी आठवायला लागतात. नदी,

विनीचा हंगाम : पाखराची कारागिरी जरा देख रे मानसाशिवशंकर बावनकुळे साकोलीश्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे... बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या कवितेतील ओळी आठवायला लागतात. नदी, नाल्या परिसरात, माळरानात भटकताना चिऽऽऽ चीऽऽऽ चीऽऽऽ असा मधूर आवाज काही पक्षी कुळे काढताना दिसतात. असा आवाज काढणारे पक्षी म्हणजे सुगरण. सुगरण पक्ष्यांना काही भागात देवचिमण्या म्हणतात. या पक्ष्यांची एकेका झाडावर २५-३० घरटी आढळून येत आहेत. या घरट्यांना देवचिमण्यांची वसाहत म्हणतात. पाखरं म्हणजे पक्षी. कोकीळेसारखे काही पक्षी वगळता सर्वच पक्षी विणीच्या काळात घरटी बांधण्यात व्यस्त दिसतात. काही पक्षी नदीच्या बट्टीत बिळे करून त्यात आपली अंडी घालतात. काहींची झाडाच्या पोखरात तर काहींची डोंगराच्या कपारीत किंवा मोठ्या दगडांच्या आडोशाला. काहींची विद्युत खांबावर तर काहींची घरटी जुन्या दुर्लक्षित भिंतीच्या छिद्रात. काही पक्ष्यांची घरटी तणसाच्या ढिगात, काहींची घरातील फोटोच्या मागे, काही पक्ष्यांची घरटी झाडावर काटक्यांच्या सहाय्याने बांधलेली तर काही घरटी जमिनीच्या दिशेने लोंबकळणारी असतात. तर काही पाण्यात तरंगणारी.सर्वच घरटी सुंदर नसतात. पण पक्षी जगतामध्ये सुगरण पक्ष्याची घरटी नयनरम्य आकर्षक असते. या वसाहतीत घरटी बांधण्याचे काम नर सुगरणपक्षी करताना दिसतो. बारीक चोचीने पढार, भूईशिंदी, दातेरी गवत, ऊसाचे बारीक पाते घटरी तयार करण्याकरिता वापरतो. ही घरटी तयार करताना बाभूळ, बोर, शिंदी, हिवर, अंजन, येण इत्यादी झाडांची निवड करतो. गारूड्याच्या पुंगीसारखे घरटे सुगरण नराच्या कौशल्यातून साकार होते. आपले कौशल्य, क्षमता पणाला लावून पृथ्वीच्या पाठीवर एक अद्भूत शिल्प तयार झाले की खानदेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना सुगरणीच्या खोप्याबद्दल विलक्षण वेड जडले होते. घरट्याचे अप्रतीप सौंदर्य पाहून त्या म्हणाल्या, सुगरण पक्षांमध्ये नर मादी हा भेद सहज ओळखता येतो. नर पिवळाधमक असून मादी त्यामानाने धुसर असते. नराचे डोळे पिवळे, घशाचा भाग काळा, उर्वरीत छातीचा भाग भुरकट पिवळसर असतो. पाठीवरील भाग गाव चिमण्यासारखा दिसतो. मादी सुगरणीवर पुसटशी पिवळसर झलक आढळून येते. नर हा उत्तम कारागिर आहे. घरटी बांधण्याचे सारे तंत्र त्याला विकसीत आहे.या घरट्याची लांबी तीन फुटापर्यंत असते. काही घरटी कमी जास्त लांबीची असतात.सुंदर घरटी बांधणे, आपल्या रुपरंगामुळे माद्यांना आकर्षीत करणे आणि प्रजोत्पादन करणे एवढेच नराचे काम असल्यामुळे बहिणाबाईंनी त्याला गण्यागंप्या नर असे म्हटले आहे. नर अनेक माद्यांचा संसार चालवत असल्यामुळे त्याला बायकांचा दादला असा अर्थ लेखक विनोद भोवते यांना अभिप्रेत आहे. मादी सुगरणी मोठ्या चतूर असतात. नराने बांधलेली घरटी आकर्षक, मजबूत आणि संसार थाटण्याजोगे आहेत की नाही याची खात्री करतात. घरट्याचे बाह्यांग, अंतरंग तपासून झाले की योग्य अयोग्य या गोष्टींचा विचार करूनच घरट्याला पसंत करतात आणि नर आपले पिवळे धमक रुप माद्यांसमोर प्रकट करतो. माद्या नराच्या नादी लागतात. ज्या नराचे घरटे आकर्षक, दर्जेदार नसते त्यांच्या नादी माद्या लागतात. दिसून येत नाही. त्यांना कौशल्य वापरून कामाला लागावे लागते. हा सारा खेळ विणीच्या काळात पाहायला मिळतो.खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसापाखराची कारागिरी जरा देखरे माणसाअसे सुगरण घरट्याकडे पाहून वाटते.