शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचा उद्घाटनाला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:24 IST

दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. तरी अधिकाऱ्यांचा दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नसल्याचे चित्र रविवारला भंडारा शहरात बघायला मिळाला.

ठळक मुद्देदिव्यांग क्रीडा स्पर्धा : स्पर्धक हिरमुसले

प्रशांत देसाई।आॅनलाईन लोकमतभंडारा : दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. तरी अधिकाऱ्यांचा दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नसल्याचे चित्र रविवारला भंडारा शहरात बघायला मिळाला.दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे क्रीडा संकुलावर उद्घाटन होते. या कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेत नावे असलेल्या निलिमा इलमे यांना वगळल्यास सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या स्पर्धेकडे पाठ दाखविली. यामुळे मोठ्या अपेक्षेने स्पर्धेत सहभागी झालेल्या दिव्यांगांच्या चेहºयावर नैराश्याचे भाव दिसून आले.सामाजिक न्याय विभाग अपंग कल्याण आयुक्त, जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारला सकाळी १० वाजता नियोजित करण्यात आले. याकरिता मान्यवरांच्या तारखा घेऊन निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. या निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशीवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांची नावे आहेत. तर प्रमुख अतिथीमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, बांधकाम व आरोग्य सभापती विनायक बुरडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी राहांगडाले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर यांच्यासह समाजकल्याण समिती सदस्य उत्तमकुमार कळपाते, मनोरमा जांभुळे, रेखा वासनिक, रेखा भुसारी, हेमंत कोरे, वंदना पंधरे, वर्षा रामटेके, निलीमा इलमे, रमेश डोंगरे, नेपाल रंगारी, संगीता मुंगुसमारे यांची नावे प्रकाशित करण्यात आली. या क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा मुळ उद्देश.जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी विशेष मुलांची शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित दिव्यांग शाळा व कर्मशाळांमधील शेकडो मुलांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदारांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार असल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर उद्घाटन सोहळ्यापूर्वी एक वेगळाच उत्साह दिसून येत होता. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनातून या दिव्यांगांना त्यांच्या आयुष्यात नव्या उमेदीने जीवन जगण्याचा मुलमंत्र मिळावा, हीच त्यांची अपेक्षा होती. एकीकडे समाजाचा या दिव्यांगांकडे बघण्याच्या दृष्टीकोणात बदल होत असल्याचे दिसून येत असतानाचा, आमदार, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडून त्यांना शब्दरूपी मायेची थाप मिळेल ही अपेक्षा असताना लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटनालाच जाणे टाळले.मागील आठवड्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील रविवारला जिल्ह्यात येऊन गेले. त्यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यामुळे एखाद्या मंत्र्यांच्या दौºयाप्रसंगीच हे अधिकारी उपस्थित राहतात. मग दिव्यांगांसाठी यांच्याकडे वेळ नसल्याचे यावरून दिसून आले. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या अशा उदासीनतेमुळे स्पर्धेसाठी आलेल्या शिक्षक व पालकांमध्येही कमालीची नाराजगी होतील. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यांकडून शाबासकीची थाप मिळावी केवळ एवढीच अपेक्षा या दिव्यांगांनी मनोमन व्यक्त केली होती. मात्र रविवार सुटीचा दिवस असल्याने कदाचित या लोकप्रतिनिधी किंवा अधिकाºयांनी या स्पर्धेला जाणे टाळले किंवा अन्य कुठले कारण असावे याबाबत कळू शकले नाही.