शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या तोंडावर बाजारात जनावरांचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:19 IST

पावसाळा अगदी उंबरठ्यावर आला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. परंपरागत पध्दतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता आहे. मात्र गोपालनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने बैलांची संख्या रोडावली आहे. परिणामी बैलबाजारात जनावरांचे भाव चांगलेच वधारले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : बैलांची संख्या रोडावली, मजुरी, बियाणे, खते आदींचे दर वाढले

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी(पालोरा) : पावसाळा अगदी उंबरठ्यावर आला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. परंपरागत पध्दतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता आहे. मात्र गोपालनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने बैलांची संख्या रोडावली आहे. परिणामी बैलबाजारात जनावरांचे भाव चांगलेच वधारले आहे. देव्हाडा येथील प्रसिध्द गुरांचा बाजारात जनावरांच्या किंमतीत अचानक सात हजार रुपयापर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहेत.तुमसर तालुक्यातील देव्हाडा येथील बैलबाजार प्रसिध्द आहे. पुर्व विदर्भातील अनेक व्यापारी येथे खरेदी-विक्रीसाठी येतात. दर बुधवारी देव्हाडीचा बैलबाजार भरतो. त्यामुळे परिसरातील शेतकरी जनावरे खरेदीसाठी येथे येतात. दर आठवड्याला येथील बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते. सध्या शेतीहंगामाचा कामाला सुरुवात झाली आहे. बैलांची आवश्यकता असल्याने शेतकरी बाजारात चाचपणी करीत असल्याचे दिसत आहे. मात्र जनावरांचे भाव वधारल्याने अनेकांचा नाईलाज होत आहे. बैलांच्या किंमतीत तीन ते सात हजारापर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यातही नामवंत जातीचे बैल मिळणे कठीण झाले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना शेतमालाचे भाव गडगडले आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे दर दुपटीने वाढले आहे. खते, किटकनाशके आणि बियाण्यांचे दरही वाढत आहे. यंत्राने मशागत करावी लागत असल्याने त्यासाठीही रोख रक्कम मोजावी लागते. पैशासाठी शेतकरी बँकाच्या दारात उभा आहे. अशा स्थितीत बाजारात बैलांचे दर वधारल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.व्यापाऱ्यांच्या दुष्टचक्रात फटकादेव्हाडा बैलबाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट दिसत आहे. सध्या शेतकरी बैल खरेदीसाठी बाजारात येत असल्याने व्यापाऱ्यांनी जनावरांचे भाव वाढविले आहे. शेतकरी आपले जनावरे विकण्यासाठी बाजारात नेतो तेव्हा भाव पडलेले असतात आणि खरेदीसाठी जातात तेव्हा भाव वधारलेले दिसतात. व्यापाऱ्यांच्या या खेळीने शेतकरी अडचणीत येत आहेत.

टॅग्स :Marketबाजार