शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खापरी गावाचे पुनर्वसन थंडबस्त्यात

By admin | Updated: April 6, 2016 00:26 IST

पूर्व विदर्भात हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोसेखुर्दचे नाव देशाच्या राजधारीपर्यंत पोहचले.

अशोक पारधी पवनी पूर्व विदर्भात हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोसेखुर्दचे नाव देशाच्या राजधारीपर्यंत पोहचले. परंतू त्या प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या नागरिकांच्या समस्या गेल्या २७ वर्षात जैसेच आहेत. पुनर्वसन झालेल्या नागरिकांच्या समस्या काही प्रमाणात सुटलेल्या असल्या तरी ज्या गावाचे पुनर्वसन अद्यापही व्हायचे आहे तेथील नागरिक त्रस्त आहेत. खापरी (रेहपाडे) गावासाठी गावठाण निश्चित व्हायचे असल्याने गावाचे पुनर्वसन थंडबस्त्यात आहे.गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठविणे सुरु झाले तेव्हापासून खापरी (रेह) गावालगतच्या शेतात पाणी शिरले आहे. एका बाजूला गोसे प्रकल्पाचे पाणी व दुसऱ्या बाजूला उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील हिंस्त्र प्राण्याचा त्रास यामुळे खापरीकरांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. अधिकारी वर्गाकडून पुनर्वसनाचे आश्वासन तेवढे वारंवार मिळत आहे. कारवाई मात्र शुन्य आहे. ग्रामस्थांना त्यांच्याच गावात जायला अभयारण्याच्या प्रवेशद्वार एंट्री केल्याशिवाय जाता येत नाही हे केवढे दुर्भाग्य.खापरी रेह गावासाठी सुरुवातीला वाही-गराडापार गावाजवळ अधिग्रहीत करण्याचे ठरले होते. जाहीरनामेदेखील प्रसिध्द झाले परंतु ते ठिकाण नंतर रद्द करण्यात आले. त्यानंतर खापरी रोडवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ जागेची पाहणी करुन गावठाणकरिता जागा निश्चित झाली पंरतु अभ्रकाचे खाणीसाठी जागा राखीव असल्याने प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले व ती जागासुध्दा मिळू शकली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. अलीकडे बेटाळा गावाजवळ जागेची पाहणी करण्यात आली परंतु दोन-तीन शेतकऱ्यांनी जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे खापरी (रेह) गावासाठी आवश्यक तेवढी जागा त्याठिकाणी उपलब्ध नाही या कारणास्तव बेटाळा शेतशिवारातील जमीन अधिग्रहीत करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे व पुनर्वसनात येण्याऱ्या अडथळ्यामुळे नागरिकांत पाहिजे त्यांना भुखंड व उर्वरितांना रोख रक्कम देण्यात यावी, असे सूर उमटू लागले आहेत. याचा आधार घेऊन गोसेखुर्द पुनर्वसन उपविभाग क्र. ९ वाहीचे सहाय्यक अभियंता यांनी सरपंच खापरी (रेह) यांना पत्र देऊन गावकरी स्वेच्छा पुनर्वसनास संमती देण्याकरिता ग्रामसभेत ठराव घेण्याबाबत असे सुचित केले. यावरुन गावात दोन मतप्रवाह निर्माण होऊन शेवटी त्यात राजकारण आले. पुनर्वसन करतांना गावाचे हित तसेच ग्रामस्थांचे हित दोन्ही महत्त्वाचे आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीचा आदर करुन पुनर्वसनाचे धोरण आखण्यात यावे व विलंब न लावता खापरी रेह गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले असून शासनाने याची दखल घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांत आहे.