शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दणका लोकमतचा : खामगाव आगार व्यवस्थापक सक्तीच्या रजेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:33 IST

खामगाव:   कामकाजातील ‘अनियमित’ता आणि विविध कारणांनी चर्चेत असलेल्या खामगाव आगार व्यवस्थापकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव:   कामकाजातील ‘अनियमित’ता आणि विविध कारणांनी चर्चेत असलेल्या खामगाव आगार व्यवस्थापकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. विभाग नियंत्रकांनी तडकाफडकी ही कारवाई केली. याकारवाईमुळे एटी विभागात खळबळ उडाली आहे. खामगाव आगारातील गलथानपणा ‘लोकमत’नेच चव्हाट्यावर आणला होता, हे येथे उल्लेखनिय!

खामगाव बस स्थानकावरील शटल सेवेची जागेवरील बुकींग बंद करण्याचे आदेश विभाग नियत्रंकांनी दिले होते. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाच्या पायमल्ली करीत खामगाव बस स्थानकात शटल सेवेची बुकींग सुरू ठेवणे. या सेवेच्या ठिकाणी मर्जीतील वाहकांची नियुक्ती करणे. यासोबतच कार्यालयीन कामकाजातील अनियमितता आणि इतर कारणांमुळे चर्चेत असलेले आगार व्यवस्थापक आर.आर. फुलपगारे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश विभाग नियत्रंक सं.श.रायलवार यांनी १२ सप्टेंबर रोजी पारीत केला आणि आगार व्यवस्थापकांचा प्रभार स्थानक प्रमुख योगेश वांदे यांच्याकडे सोपविला. दरम्यान, शटल सेवेच्या जागेवरील बुकींग संदर्भात शेगाव येथील आगार व्यवस्थापकांवरही कारवाईची कुºहाड कोसळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे एसटी विभागात एकच खळबळ उडाली आहे.

 महिला वाहकांनी घातला होता घेराव!

शटल सेवेच्या जागेवरील बुकींगच्या ठिकाणी मर्जीतील वाहकांची वारंवार ड्युटी लावल्याप्रकरणी महिला वाहकांनी आगार व्यवस्थापकांना घेरावही घातला होता. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार आली होती.

 लोकमतचा पाठपुरावा!

खामगाव आगारातील गलथानपणा आणि महिला वाहकांच्या समस्यांना सर्वप्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. शटल सेवेवरील मर्जीतील वाहकांच्या ड्युटीचेही प्रकरण ‘लोकमत’नेच चव्हाट्यावर आणले होते. 

खामगाव येथील आगार व्यवस्थापक आर.आर. फुलपगारे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांचा प्रभार स्थानक प्रमुख वांदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

- सं.श.रायलवार, विभाग नियत्रंक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव