शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महालगाव नाकाडोंगरी मार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:29 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग राज्याच्या अखत्यारीतील नाकाडोंगरी महालगाव मार्गाची रेतीच्या ओव्हरलोडेड वाहतुकीने दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देरेतीची ओव्हर लोडेड वाहतूक : आठ गावातील नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सार्वजनिक बांधकाम विभाग राज्याच्या अखत्यारीतील नाकाडोंगरी महालगाव मार्गाची रेतीच्या ओव्हरलोडेड वाहतुकीने दुरवस्था झाली आहे. मार्गावर खड्डेच खड्डे पडल्याने नागरिकांना पैदल चालणे मुश्किल झाले आहे. रेतीचे ट्रक बंद करण्याची मागणी होत आहे.सिहोरा परिसरात असणाºया वैनगंगा नदीच्या खोºयातून रेतीचा ुपसा सुरु आहे. या रेतीची निर्यात मध्यप्रदेशातील शिवणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. मांडवी गावानजीक वैनगंगा नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यात येत असला तरी ट्रक मध्ये ओव्हरलोडेड रेती भरली जात आहे. सिहोरा पोलीस स्टेशनच्या समोरील मार्गाने या ट्रकची वाहतूक सुरु आहे. महालगाव नाकाडोंगरी या जंगल व्याप्त १८ कि.मी. नंतरच्या मार्गावर ओव्हरलोडेड रेतीच्या वाहतुकीने २ ते ३ फुट खोल खड्डे पडली आहे. या मार्गावरील पुलाचे बांधकाम घटली असून अपघाताला आमंत्रण देत आहे. कोट्यवधी रुपयाचा खर्च मार्ग दुरुस्तीकरिता येणार आहे. रेत माफियांना ओव्हरलोडेड रेतीची वाहतूक करण्याची मंजूरी देण्यात आल्याचे चित्र परिसरात आहे. या ट्रक व माफियावर आजपर्यंत कारवाई करण्यात आली नसल्याने गावकºयांना ही बाब खटकणारी आहे. पोलिसांना बाय बाय करीत ही रेतीची ओव्हरलोडेड ट्रक पोलीस स्टेशनचे समोरून पोबारा करीत आहेत. राज्य मार्गाची वाहतुकीने दुरावस्था झाली असताना प्रशासन आणि पुढारी शांत आहे. नाकाडोंगरी महालगाव मार्गावर वारपिंडकेपार, कवलेवाडा, सोंड्या, पाथरी, सक्करधरा गावे आहेत. याच मार्गावर माजी खासदार शिशुपाल पटले आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांचे गृहगाव वारपिंडकेपार गाव आहे. या गावात य जा करणारा मार्ग नासधुस झाला आहे. की लोकप्रतिनिधी एरवी रास्ता रोको आंदोलनासाठी चर्चेत आहेत. परंतु त्यांचेही दुर्लक्ष झाले आहे. सिहोरा, चुल्हाड, बपेरा आणि आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रातून जाणारा हा एकमेव रस्ता रेतीच्या ओव्हरलोेडेड वाहतुकीने त्रासदायक झाला असताना जि.प. सदस्य ते पं.स. सदस्य शांत बसली आहे. ग्राम पंचायतीची आचारसंहिता असल्याने सर्वांनी डोळे बंद केल्याची माहिती मिळाली आहे. याच संधीचा फायदा रेतीचे माफीया यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. दर तासाला ट्रकच्या संख्येत वाढ झाली आहे. भरधाव वेगात या ट्रकची वाहतूक सुरु आहे. विद्यार्थी आणि नागरिकांचे जीव धोक्यात आली आहे. समाज रक्षणाची जबाबदारी सांभाळणारे रस्ते सोडून रेती घाटावर ट्रॅक्टरचा शोध घेत आहेत. सिहोरा परिसरात असुरक्षितता असल्याने ही वाहतूक बंद करण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरणार आहेत.