शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कोथुर्णा-इंदुरखा वितरिकेत केरकचरा

By admin | Updated: May 19, 2014 23:14 IST

बावनथडी प्रकल्पाची कोथूर्णा-इंदुरखा प्रमुख वितरिका मांढळ (दे.) शिवारात कचरामय झाल्याने प्रकल्पाचे पानी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो.

तुमसर : बावनथडी प्रकल्पाची कोथूर्णा-इंदुरखा प्रमुख वितरिका मांढळ (दे.) शिवारात कचरामय झाल्याने प्रकल्पाचे पानी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो. लोखंडी चॅनेल गेट येथे लावण्यात आले नाही. मांढळ (दे.) शिवारात वितरिका ओव्हरफलो होऊन शेतात पाणी जाऊन शेकडो हेक्टर शेतातील धानपिकाचे नुकसान होते या समस्येकडे लक्ष देण्यास अधिकार्‍यांकडे वेळच नाही.

मांढळ (दे.) शिवारातून पुढे कोथुर्णा- इंदुरखा या गावाकडे बावनथडी प्रकल्पाची मुख्य वितरीका जाते. मांढळ (दे.) शिवारात टी पॉईंटवर कोथूर्णा-इंदुरखा वितरिका आहे. सध्या ती कचरामय झाली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ वाहत येतो. तो कचरा व गाळ या टी पॉईंटवर जमा झाला आहे. पुढे वितरीकेत पाणी वाहत जाण्याकरिता या कचर्‍यामुळे अडथळा निर्माण होतो. या अडथळामुळे मांढळ (दे.) शिवारात मुख्य वितरिका ओव्हरफलो होते. त्यामुळे शेकडो हेक्टरमधील धान पिक धोक्यात येते. या ओव्हरफलोमुळे वितरीकाच वाहून जाण्याची भीती शेतकर्‍यांनीव्यक्त केली आहे.

टी पॉईंटवर पुढे वितरिकेची पिचींग करण्यात आली नाही. कचर्‍याची अडथळा पूर्ण करुन पाणी पिंचीग न झालेल्या वितरीकेतुन पुढे वाहत जाते. अनेक ठिकाणी वितरिका फुटल्या असल्याने पाणी इतरत्र जिकडे दिशा मिळाली तिकडे वाहत जाते. त्यामुळे शेकडो शेतकर्‍यांचे धान पिकाला येथे धोका निर्माण झाला आहे.

बावनथडी प्रकल्प कार्यालयाने या टी पॉईंटवर चॅनेल गेट अजूनपर्यंत लावले नाही. नियमित कचर्‍यांची निकासी केली जात नाही. स्थानिक शेतकर्‍यांनी तक्रार केल्यावरही त्याची दखल घेतली जात नाही. असा आरोप मांढळ (दे.) येथील शेतकर्‍यांनी केला आहे. या परिसरातील शेकडो शेतकर्‍यांच्या जमिनी बावनथडी प्रकल्पात जाऊन एका दशकापेक्षा जास्त काळ झाला तरी अजूनपर्यंत मोबदला देण्यात आला नाही. या मोबदल्याकरिता येथील शेतकरी प्रकल्प कार्यालयाकडे खेटा मारीत आहेत. शेतकर्‍यांचा असंतोष पाहता पावसाळ्यापूर्वी येथे आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक शेतकर्‍यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)