शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा अद्ययावत ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST

सामान्य रुग्णालयातील प्राणवायू प्रकल्प, पेडियाट्रिक वार्ड, कोविड वार्ड, आयसीयू वार्ड, आरटीपीसीआर चाचणी केंद्र आदी ठिकाणी भेट देऊन त्यांनी तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली होती. वरठी येथील सनफ्लॅग कंपनी मधील ऑक्सिजन प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता.

ठळक मुद्देप्राजक्ता लवंगारे : जिल्हा रुग्णालयाला भेट, प्राणवायू प्रकल्पाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले. जिल्ह्याला कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे. आता दुसऱ्या लाटेत जाणवलेल्या उणिवा दूर करून संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा अद्ययावत व सज्ज ठेवा, अशी सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, नितीन सदगीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, तहसीलदार अक्षय पोयाम, साहेबराव राठोड उपस्थित होते.सामान्य रुग्णालयातील प्राणवायू प्रकल्प, पेडियाट्रिक वार्ड, कोविड वार्ड, आयसीयू वार्ड, आरटीपीसीआर चाचणी केंद्र आदी ठिकाणी भेट देऊन त्यांनी तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली होती. वरठी येथील सनफ्लॅग कंपनी मधील ऑक्सिजन प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे तिसऱ्या संभाव्य लाटेची पूर्वतयारी म्हणून सनफ्लॅग कंपनी जवळ ५०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या जागेची पाहणी करून त्यांनी तात्काळ रुग्णालया सुरू करण्याची सूचना केली.

कोरोनामुक्त गाव करण्यावर भर द्या- कोरोनामुक्त गाव करण्यावर भर देण्यात यावा असे सांगून लवंगारे म्हणाल्या की, कोरोनामुक्त गावात शाळा सुरू होतील असे नियोजन करावे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करणे आवश्यक असून सर्व खबरदारी घेऊन याबाबत पावले उचलावीत. क्रियाशील रुग्ण नाहीत तसेच शून्य रुग्ण असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल