शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ताणतणाव नियंत्रणात ठेवा; मधुमेह, उच्च रक्तदाबाचा वाढतोय धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 14:07 IST

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम : मधुमेहाने वयाचे बंधन नाकारले, प्रतिबंध गरजेचा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : बदलती जीवनशैली, नोकरी, व्यवसायात निर्माण होणाऱ्या ताणाचा तसेच व वाढत्या स्पर्धेचा खूप मोठा परिणाम आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली पाहावयास मिळत आहे.

आता कोणत्याही वयाचे आणि वर्गवारीतील लोक मधुमेहाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे आगामी वर्षात या रोगाचे प्रमाण अधिक वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांमध्ये झपाट्याने लोकांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. त्याचा मोठा परिणाम आरोग्यावर होऊन जिल्ह्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे.

केवळ नियंत्रण हाच पर्याय• साधारण १५-२० वर्षापूर्वी मधुमेह हा उच्च वर्गापुरताच मर्यादित असणारा आजार होता. त्यामुळे चेष्टेने त्याला श्रीमंतांचा आजारही म्हटले जायचे. पण, आता सर्वच स्तरांतील लोकांची जीवनशैली बिघडली आहे. त्यामुळे आता कोणत्याही आर्थिक वर्गात मधुमेहाचे रुग्ण आढळतात. चोरपावलांनी शरीरात प्रवेश करणाऱ्या या आजाराला नंतर फक्त नियंत्रित ठेवता येते. त्यातून पूर्ण बरे होता येत नाही. म्हणूनच योग्य वेळेत जीवनशैली सुधारून मधुमेह टाळणे हाच पर्याय आहे.

प्रतिबंधाचे कार्य अवघडटाइप वन मधुमेह हा आयुष्यभराचा आणि जीवनशैलीशी निगडित आजार आहे. नियमित देखरेख आणि व्यायाम यांना सुयोग्य आहाराची जोड दिल्यास मधुमेह नियंत्रित होऊ शकतो. मात्र, तसे होताना दिसत नसून मधुमेहग्रस्तांची संख्या वाढत आहे.

मुले, महिला मधुमेहाच्या विळख्यातबदलत्या जीवनशैलीमुळे बालकांमधील वाढता मधुमेह ही मोठी समस्या बनली आहे. वाढते जंकफूडचे प्रमाण आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा, यामुळे मधुमेह होण्यासाठी पूरक असे वातावरण तयार झाले आहे, चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजारांना मुलांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, महिलांमधील वाढता ताण हे त्यांच्यातील वाढत्या मधुमेहाचे मुख्य कारण आहे.

नवजात अर्भकांनाही मधुमेहमहिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गर्भवती महिलांद्वारे होणाऱ्या बाळाला जन्मतःच मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. याचापरिणाम म्हणजे नवजात बालकांचे कमी असणारे वजन, जन्माच्या वेळी कमी वजन असणाऱ्या बालकांना जास्त खाणे दिले जाते. त्यामुळे नवजात बालकांमध्ये मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

ही आहेत मधुमेहाची कारणे• कामाचा अधिक ताण• डबाबंद पदार्थांचा अतिरेकी वापर चुकीचा आहार व अवेळी जेवण• व्यायामाचा अभाव, योग व सकाळी फिरण्याचा अभाव• गोड पदार्थांचे अतिसेवन • व्यसनाधीनता

शारीरिक हालचाल नाही, बैठे काम करणे, जंकफूड जास्त प्रमाणात खाणे, कॉम्प्युटर, मोबाइल जास्त प्रमाणात वापरणे यामुळे मधुमेह वाढत आहे. त्यासाठी लोकांनी राहणीमान बदलणे आवश्यक आहे. तरच मधुमेहाचे प्रमाण कमी होऊ शकते.- डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा. लोकांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे. मनावरील

ताण कमी करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार व योगासने करणे गरजेचे आहे. कमी झोप घेणे, व्यसनाधीनता, विभक्त कुटुंब पद्धती, वाढता एकटेपणा यामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत.- डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.

टॅग्स :diabetesमधुमेहchandrapur-acचंद्रपूर