संपत खिल्लारी यांचे प्रतिपादन : महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्यांचे वाटपजवाहरनगर : शासन दरबारी अधिक रकमेची फलदायी योजनांचा लाभ घेताना आगावू रक्कम दिल्याशिवाय योजना मिळत नाही. ही संकुचित भावना लाभार्थ्यामध्ये नसावी. ध्येय पुढे ठेवूनच यश मिळत असते, असे प्रतिपादन भंडऱ्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी यांनी केले.तहसील कार्यालय भंडारा मार्फत महाराजस्व अभियानांतर्गत शहापूर महसूल मंडळद्वारे परसोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील पटांगणात आयोजित शिबिरात डॉ. संपत खिल्लारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, चंद्रप्रकाश दुरूगकर, समाज कल्याण विभागाचे माजी सभापती राजकपूर राऊत, तहसीलदार सुशांत बनसोडे, पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम, अमित वसानी, नायब तहसिलदार सी.टी. तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेश्राम, सरपंच मंजुका वंजारी, उपसरपंच भाऊराव वैरागडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष होमदेव चकोले व विविध १३ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी महसूल विभाग, पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग, कृषी विभाग, महावितरण तथा वीज वितरण कंपनी विभाग, जिल्हा व तालुका भूमी अभिलेख विभाग, शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, राज्य परिवहन विभाग, भंडारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे योजनेची माहिती देण्यात आली.यावेळी प्रत्येक लाभार्थ्यांना धनादेश क-प्रपत्र, जन्माचे दाखले, जातीचे, उत्पन्नाचे व अधिवासी दाखले, घरकूल योजनेचे धनादेश, ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस पाटील दौलत वंजारी यांनी केले. आभार नायब तहसिलदार सी.टी. तेलंग यांनी मानले. कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी जयंत सोनवाने, तलाठी के.एस. क्षीरसागर, तंटामुक्ती अध्यक्ष होमदेव चकोले, तसेच मंडळ विभागातील अन्य तलाठ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
ध्येय ठेवा, यश मिळेल
By admin | Updated: October 3, 2015 00:36 IST