शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

शिक्षणासाठी चिमुकल्या बालकांची केविलवाणी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:51 IST

सिहोरा परिसरातील गुढरी ग्राम पंचायतीला संलग्नीत असणाऱ्या खैरटोला गावातील चिमुकल्या बालकांची शिक्षणासाठी करण्यात येणारी धडपड वेदनादायक आहे. निरागस बालके जंगलाचे वाटेने पायदळ प्रवास करीत आहेत. गावात शाळा आणि अंगणवाडी नसल्याने या बालकांचे जीव वेशीवर टांगले जात आहे.

ठळक मुद्देरोज ५ कि.मी.चा पायी प्रवास : शाळा अन् अंगणवाडीही नाही, खैरटोला येथील प्रकार

रंजित चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गुढरी ग्राम पंचायतीला संलग्नीत असणाऱ्या खैरटोला गावातील चिमुकल्या बालकांची शिक्षणासाठी करण्यात येणारी धडपड वेदनादायक आहे. निरागस बालके जंगलाचे वाटेने पायदळ प्रवास करीत आहेत. गावात शाळा आणि अंगणवाडी नसल्याने या बालकांचे जीव वेशीवर टांगले जात आहे.सातपुडा पर्वत रांगाचे घनदाट जंगलात गुडरी ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीला १५ ते २० घरांची वस्ती असणारा खैरटोला गाव संलग्नीत करण्यात आलेला आहे. चांदपूर जलाशयाचे शेजारी असणाºया या गावात रोजगाराचा अभाव आहे. जलाशयातील मासेमारीवर या वस्तीत राहणारे लोकांचे उदरनिर्वाह आहे. गावात विकासाचे जाळे निर्माण करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले असले तरी शिक्षणाची दालने या गावात निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद पर्यंत प्रत्यत्न झाले नाहीत.या गावात शाळा नाही. साधे मिनी अंगणवाडी नाही. वस्ती शाळा निर्मितीचे नियोजन शासनाचे असले तरी या गावात वस्तीशाळा मंजुरीकरिता साधे फाईल तयार करण्यात आली नाही. या गावात असणारे निरागस चिमुकले बालके खांद्यावर पुस्तकाचे ओझे घेवून घनदाड जंगलातून ५ कि.मी. अंतरावर असणारे खंदाड गावातील जिल्हा परिषदेची शाळा गाठत आहेत. इयत्ता १ ते ४ थी पर्यंत त्यांची वय तशी कमीच आहे. या वयात शिक्षणासाठी त्यांचा पायदळ प्रवास मनाला वेदना देणारे आहे. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत या बालकांची धडपड बघून जंगलाचे वाटेने जाणाºयांचे मन शुब्ध करीत आहे.जंगलात हिंसक आणि वन्य प्राण्यांचे बस्तान आहे. या वन्य प्राण्यांची भीती त्याचे मनात असली तरी शिक्षणाची जिद्द बघून भीती ही लांबच आहे. या मार्गाने जाणारे मोटर सायकलधारक बालकांना बसण्याचे सांगतात .परंतु या बालकांचे नाकारणे असती. ते कधी कुणाचे वाहनावरून खंदाड गावचे शाळेपर्यंत प्रवास करीत नाही. अलीकडे बालके सुरक्षीत नाहीत.खैरटोला ते खंदाड गावाचे अंतर अडीच कि.मी. चे आहे. परंतु या बालकांचा पायदळ प्रवास ५ कि.मी. अंतरचा आहे. या गावाचे मार्गावरील रापनिची बस फेरी आहे. या बस फेरीचा फायदा या बालकांना होत नाही. पायदळ प्रवास करून शिक्षणासाठी केवीलवाणी धडपडणारे इयत्ता १ ते ४ पर्यंतचे चिमुकले बालक वातावरणाने असुरक्षित आहेत. या गावात अंगणवाडी नाही. यामुळे बालकांना शासनाचे सुविधा प्राप्त होत नाही.गर्भवती मातांना आहाराचे वाटप प्रभावित होत आहेत. राज्य शासन अशा गावात वस्तीशाळा आणि मिनी अंगणवाडी ना मंजुरी देत आहे. परंतु या गावात दोन्ही सुविधा नाही. लोकप्रतिनिधी या गावात क्वचित हजेरी लावत आहेत. गावात सिमेंट रस्ते आणि पिण्याचे पाणी या सुविध निकाली काढण्यात आलेल्या आहे. परंतु शिक्षणाचे सोयी व बालकांचे सुरक्षेकरिता साधे यंत्रणेमार्फत प्रयत्न करण्यात आले नाही.उच्च शिक्षणाकरिता या गावातील मुले सिहोरा गावात धाव घेत आहेत. त्याचे प्रवास रापनिचे बस ने होत आहे. त्याचे वय १२ वर्गाचे पुढे आहे. परंतु पायदळ प्रवास करणारी बालके या वयाचे आतील आहेत. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर समस्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.या गावात असणारी बालकांची शिक्षणासाठी धडपड मन हेलावणारी आहे. शाळा, ग्रामपंचायत व शिक्षण विभाग यांचेत समन्वय साधून बालकांच्या सुरक्षेसंदर्भात प्रयत्न करणार आहे.-धनेंद्र तुरकर, सभापती जि.प. भंडारा.या गावात अंगणवाडी नाही. अन्य गावांना गाव संलग्नीत असले तरी निकषानुसार मिनी अंगणवाडी मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहे.-रेखा ठाकरे, सभापती महिला व बाल कल्याण विभाग भंडाराबालकांना ने आण करण्याची जबाबदारी शाळा समिती व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून झाली पाहिजे. अशा एका वाहनाची सोय करण्याची गरज आहे.-गुड्डू शामकुवर, सामाजिक कार्यकर्ता चुल्हाड.