शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील कवलेवाडा वांगी धरण ठरतंय 'सुसाईड पॉइंट', पुन्हा एका तरुणाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2023 18:22 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गावांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील कवलेवाडा वांगी गावांचे शेजारील धरण सुसाईड पॉइंट ठरत आहे.

गोपालकृष्ण मांडवकर  

भंडारा : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गावांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील कवलेवाडा वांगी गावांचे शेजारील धरण सुसाईड पॉइंट ठरत आहे. या धरणात दोन्ही जिल्ह्यातील तरुणांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास हरदोली येथील योगेश नंदलाल बोपचे (२२) या तरुणाचा मृतदेह आढळला.

सिहोरा परिसरातील हरदोली येथील योगेश नंदलाल बोपचे या २२ वर्षीय तरुणाने नैराश्यातून १५ मे रोजी धरणात उडी घेतली. धरणाच्या मार्गावर त्याने मोटारसायकल उभी ठेवली आहे. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास योगेशचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत धरणातील पाण्यात आढळला. वडिलांच्या निधनानंतर योगेश हा आईचा एकुलता आधार होता. तरुणाई नैराश्यातून जीवघेणे निर्णय घेत आहेत. यामुळे चिंता वाढल्या आहेत. आत्महत्येचे कारण कळले नाही. धरण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरेनदीच्या पात्रात जाण्यास मज्जाव घालणारे फलक लावण्यात आले असले फलकाला बेदखल करीत धरणाच्या ऊर्ध्व भागात पर्यटक जात आहेत. या ऊर्ध्व भागात अनेक जीवघेण्या घटना घडल्या आहेत. पोहण्याच्या नादात अनेक तरुणांनी जीव गमावला आहे. या भागात खोल डोह असल्याचे सांगितले जाते. नैराश्यातून तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. धरण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पथदिवे लावण्यात आले आहेत. पर्यटकांना भुरळधापेवाडा उपसा सिंचन योजना आणि अदानी वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर कवलेवाडा वांगी गावाच्या शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणामुळे सिहोरा आणि तिरोडा शहराचे अंतर १३ किमीचे झाले असून तिरोडा आगाराच्या बसेस चांदपूर देवस्थानपर्यंत धावत आहेत. या धरणात पाणी अडविण्यात आल्याने पर्यटकांना भुरळ घालत आहे. ३० किमी अंतरापर्यंत नदीच्या पात्रात पाणी अडविण्यात आले आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडारा