शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

काशीबाई म्हणते, घर देता का... घर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:01 IST

खिळखिळे झालेले मातीचे घर. वादळ-वाऱ्यात केव्हा कोसळेल याचा नेम नाही. साधी वाºयाची झुळुकही आली तरी अंगावर काटा उभा राहतो. अशा तडे गेलेल्या घरात एक वृध्द महिला गत काही वर्षांपासून नाईलाजाने वास्तव्यास आहे. शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत अर्जही केला.

ठळक मुद्देघरकुलाची प्रतीक्षा : कागदपत्र देऊनही दोन वर्षांपासून प्रतीक्षा

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : खिळखिळे झालेले मातीचे घर. वादळ-वाऱ्यात केव्हा कोसळेल याचा नेम नाही. साधी वाºयाची झुळुकही आली तरी अंगावर काटा उभा राहतो. अशा तडे गेलेल्या घरात एक वृध्द महिला गत काही वर्षांपासून नाईलाजाने वास्तव्यास आहे. शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत अर्जही केला. परंतू दोन वर्षांपासून प्रतीक्षा कायम आहे. आता दिव्यांग वृध्द महिला घर देता का... घर! अशी आर्त विणवनी करीत आहे.ही कहाणी आहे तुमसर तालुक्यातील माडगी येथील काशीबाई संतोष कुंडलीक या ७५ वर्षीय वृध्द महिलेची. आपल्या धनराज नावाच्या मुलासोबत ती या झोपडीत राहते. काशीबाई दिव्यांग असल्याने धनराजच्या भरोश्यावर तिचा चरितार्थ चालतो. गत ५० वर्षांपासून कुंडलिक कुटूंब माडगीत वास्तव्याला आहे. पंरतू अद्यापही हक्काचे घर मात्र मिळाले नाही. घराच्या प्रतीक्षेत काशीबाईचे पती संतोष यांचा मृत्यू झाला.पंतप्रधान घरकूल योजनेमुळे आपल्या घराचे स्वप्न होईल, असे काशीबाईला वाटते. त्यासाठी त्यांनी मुलाच्या मदतीने संपुर्ण कागदपत्रे जमा केली. ग्रामपंचायत व संबंधित एजन्सीकडे अर्ज दिला. परंतू घरकुलाचा अद्यापपर्यंत थांगपत्ता नाही. मागेल त्याला घर देण्याची शासनाची योजना आहे. प्रत्येकाला घरकूल देण्याचा शासनाच्या मानस आहे, असे असतानाही दिव्यांग काशीबाई मात्र घरासाठी प्रतीक्षा करीत आहे. मातीचे असलेले घर गतवर्षीच्या वादळात उध्दवस्त झाले होते. उडालेले छप्पर पैसे जमवून प्लास्टिक ताडपत्रीने अच्छादीत केले. मातीच्या घराला तडे गेले आहे. वादळात घर कोसळते की काय अशी भीती असते. या पावसाळ्यापूर्वीतरी आम्हाला हक्काचे घर मिळेल काय, अशी विनवणी काशीबाई करते.काय करावे काही सुचत नाहीशासनाकडे घरकुलासाठी अर्ज देवूनही उपयोग झाला नाही. या पावसाळ्यात माझी झोपडी वाचेल काय? आकाशात काळे ढग जमा झाले की मन घाबरुन जाते व काय करावे सुचत नाही. मायबाप सरकारने पावसाळ्यापूर्वी घरकूल मंजूर करावे अशी मागणी काशीबाई करीत आहे.प्रत्येकाला घर योजनेचा फज्जा उडाला आहे. दिव्यांग वृध्द महिलेला घरकुलासाठी दारोदारी भटकावे लागते. ही लाजीरवाणी बाब आहे. प्रशासनाला खंत कशी वाटत नाही.- विपील कुंभारेकाँग्रेस नेते, माडगी