शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कापगते विद्यालयाची पूनम जिल्ह्यात प्रथम

By admin | Updated: June 14, 2017 00:11 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे दहावीचा निकाल घोषित केला.

जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८५.०३ टक्के : नागपूर विभागात भंडारा द्वितीय क्रमांकावर लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे दहावीचा निकाल घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८५.०३ इतका लागला. साकोली येथील नंदलाल पाटील कापगते विद्यालयाची विद्यार्थीनी पुनम प्रमोद रोहणकर या विद्यार्थीनीने ९८ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तिला ५०० पैकी ४९० गुण मिळाले असून कला व क्रीडा क्षेत्रातील सहभागामुळे तिला अतिरिक्त १० गुण मिळाले आहेत.द्वितीय क्रमांकावर भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचा विद्यार्थी चिन्मय अनिल नवलाखे याने प्राप्त केला. त्याला ५०० पैकी ४८४ गुण आहेत. यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. एकूण १९ हजार ४२५ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या निकालाची टक्केवारी स८१.३८ असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ८८.७९ इतकी आहे. ही टक्केवारी ७.४१ ने अधिक आहे. मुलींचीच भरारीयावर्षीही निकालात मुलांना पिछाडीवर टाकत मुलींनी आघाडीची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्यातून सातही तालुके मिळून १६ हजार ५१८ विद्यार्थी उतीर्ण झाले. यापैकी ८ हजार १६ मुले तर ८ हजार ५०२ मुली उर्तीर्ण झाल्या. बारावीच्या परीक्षेतही मुलांपेक्षा मुलींनी आघाडी घेतली होती.तालुकानिहाय ऊत्तीर्ण विद्यार्थी१८ हजार ५१८ उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये भंडारा तालुक्यातून ४,२६८ पैकी ३,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून २,२०७ पैकी १,९२३ विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून १,६११ पैकी १,४३३ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून २,३६८ पैकी १,९६५ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून २,६९६ पैकी २,१८७ विद्यार्थी, साकोली तालुक्यातून २,६७७ पैकी २,२९६ विद्यार्थी तर तुमसर तालुक्यातून ३,५९८ पैकी ३,०३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १९ शाळांचा निकाल १०० टक्केजिल्ह्यात दहावीच्या निकालात एकूण १९ शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे. यात जेसीस इंग्लिश हायस्कूल भंडारा, साईराम हायस्कूल परसोडी(ता.भंडारा), एस.एस.सारडा महिला समाज माध्यमिक विद्यालय भंडारा, अनुसूचित जाती व नवबुद्ध मुलांची शासकीय शाळा, प्राईड कॉन्व्हेंट शाळा भंडारा, युनायटेड कॉन्व्हेंट ठाणा (जवाहरनगर), विद्याविहार मंदिर लाखांदूर, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मासळ ता. लाखांदूर, हायसेंथ लिटिल फ्लॉवर हायस्कूल गडेगाव (लाखनी), जिल्हा परिषद हायस्कूल पोहरा, गांधी विद्यालय विरली खंदार ता.पवनी, प्रबुद्ध हायस्कूल कन्हाळगाव ता. पवनी, नॅशनल उर्दू हायस्कूल पवनी, पवन पब्लिक स्कूल पवनी, कृष्णमुरारी कटकवार इंग्लीश हायस्कूल साकोली, एम दिक्षित माध्यमिक विद्यालय आलेसूर ता. तुमसर, सावित्रीबाई मेमोरियल हायस्कूल गोबरवाही ता.तुमसर, सेंट जॉन मिशन इंग्लीश मिडियम हायस्कूल तुमसर, मातोश्री विद्यामंदिर विनोबा नगर तुमसर या शाळांचा समावेश आहे. दोन आठवड्यांपूर्वी घोषित करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागातून प्रथम क्रमांकावर होता. दहावीच्या निकालात मात्र जिल्ह्याला द्वितीय प्राप्त झाले आहे. बेस्ट आॅफ फाईव्हच्या निकषावर लागलेल्या निकालामुळे विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी तथा कला व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीमुळे मिळालेल्या गुणांचे आधारे टक्केवारी काढली जाते. संजय साठवणे ।दहावीच्या परिक्षेत प्रथम आलेल्या पुनमला मेकॅनिकल इंजिनिअर बनण्याची इच्छा आहे. आई-वडिलांचा आशिर्वाद व गुरूजणांच्या मार्गदर्शंामुळेच हे यश लाभल्याची प्रतिक्रीया तिने भ्रमणध्वनीवर दिली. दररोज नऊ तास अभ्यास व नियमित सराव करायची असे तिने सांगितले. पुनमचे वडील प्रमोद रोहणकर हे नंदलाल पाटील कापगते विद्यालयात शिक्षक तर आई वर्षा या गृहीणी आहेत. पुनम ही कुटुंबासोबत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे गेली आहे. शाळेचे प्राचार्य गोमासे व शिक्षकवृदांनी तिचे कौतुक केले आहे.