भाजीपाला विकून केले स्वप्न पूर्ण : संघर्षाला दिले जिद्दीचे बळसिराज शेख मोहाडी मनात जिद्द आणि काम करण्याची ओढ असेल तर कितीही अडचणी आणि कसल्याही संकटांना सामोरे जावून आपले धैर्य गाढता येते, अशक्य असे काहीच नसते हे कान्हळगावसारख्या छोट्याशा खेड्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने चित्रपट सृष्टीत काम मिळवून दाखवून दिले आहे. आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी, असे त्याचे हे कार्य आहे.मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव सिरसोली येथील एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेला प्रविण तेजराम तोहारे याला अभियनाचा खुपच छंद होता. आपणही रूपेरी पडद्यावरचा हिरो बनावे असे स्वप्न तो नेहमी पाहायचा. यासाठी त्याने नागपूर येथील नाट्यभूमीमध्ये प्रवेश करून अनेक नाटकामध्ये काम केले. चित्रपटात काम करण्याची इच्छा घेवून तो मुंबईला गेला. चित्रपटसृष्टीत काम मिळविणे एवढे सोपे नसते हे त्याला तिथे गेल्यावर कळले. परंतु त्याने काम प्राप्त करण्यासाठी संघर्ष करणे सोडले नाही. प्रविण मोहारेची काही कलाकारासोबतच निर्माता, दिग्दर्शक सोबतही ओळख झाली. मात्र चित्रपटात काम मिळाले नाही. मुंबईत जीवन जगण्यासाठी त्योन भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. अशातच त्याला फिल्म सेन्सार बोर्ड मुंबई कार्यालयात एजेंटाचे काम मिळाले. या माध्यमातून तो डाक्युमेंटरी फिल्म, व्हिडीओ अल्बम, तेलगु, कन्नड चित्रपटांना सेन्सर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळवून देण्याची प्रक्रिया पूर्ण करायचा. मात्र सेन्सार बोर्डात प्रमाणपत्र देण्यासाठी होत असलेला भ्रष्टाचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता म्हणून त्याने याविरूद्ध आवाज उठविला. मागील वर्षी त्याची मुलाखत आजतक मुंबई मेट्रो या वृत्तवाहिनीवर झळकली आणि काही महिन्यातच सेन्सार बोर्डाचे सीईओ राकेश कुमार यांना निलंबित करून अचक करण्यात आली. मात्र यामुळे प्रविण मोहाराचे सेन्सार बोर्डाचे काम बंद करण्यात आले. तदनंतर त्याने भाजीपाल्याची दुकान पुन्हा थाटली. अशातच त्याला तामीळ दिग्दर्शक श्रीकारा बाबु यांनी तामीळ चित्रपटात काम करण्याची संधी दिली. एका खासगी प्रॉडक्शन कंपनीच्या बॅनरखाली हैदराबाद येथे त्याची शूटिंग सुरू आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी कशी धमाल करतात यावर आधारित एक्शन चित्रपट असून हा चित्रपट तामिळ, तेलगु, कन्नड व मराठी भाषेत येणार असल्याची माहिती त्याचे मित्र वैभव डेकाटे व रजत राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा तसेच छोट्याशा गावातील या युवकाने संघर्ष करून हॉलीवूडमध्ये प्रवेश मिळविला. आता त्याचे स्वप्न बॉलीवूडमध्ये काम प्राप्त करने आहे आणि त्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे.
कान्हळगावचा युवक पोहोचला चित्रपटसृष्टीत
By admin | Updated: April 18, 2016 00:28 IST