शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी छात्र संघाचा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 21:48 IST

डीबीटी पद्धत बंद करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : डीबीटी पद्धत बंद करण्याची मागणी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : डीबीटी पद्धत बंद करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.सदर मोर्चा दुपारी १२ वाजताच्या सुमारास लाल बहादूर शास्त्री चौकातून काढण्यात आला. हा मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आदिवासी विभागाच्या शासकीय वसतिगृहातील भोजनाची खानावळ बंद करून त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये हस्तांतरण करण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पुणे ते नाशिक पायी संघर्ष यात्रा संविधानिक मार्गाने आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह महाराष्ट्रातील विद्यार्थी काढत होते. दरम्यान पोलीस यंत्रणेने त्यांच्यावर दडपशाही करून मोर्चा होऊ दिला नाही. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पुणे पोलीस आयुक्त येथे घेऊन गेले.शासनाने संविधानाचे उल्लंघन केलेले आहे. याकरिता थेट लाभ हस्तांतरण ही योजना बंद करण्यात यावी, पंडीत दीनदयाल उपाध्याय योजना बंद करण्यात यावी, विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात वसतिगृहाची वाढ करण्यात यावी, विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण करून योग्य वेळी वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा, सर्व वसतिगृहाची इमारती प्रशासकीय उभारण्यात यावे, यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे.शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांविषयी चर्चा करुन त्यांना मागण्यांचे निवेदन सोपविले. यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश कळपाते, मंगेश खोब्रागडे, गिरीश मानकर, स्वप्नील गजभिये, शरयू डहाट, कल्याणी बोरकर, पायल ठवरे, प्राजक्ता हुमणे, सिद्धार्थ घोडीचोर, उदय पांडे, विजयकांत बडगे यांच्यासह शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांचा समावेश होता.