शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार महिन्यातच झाली रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST

मात्र काही कारणास्तवर अनेक शेतकरी, ग्रामस्थ याच रस्त्यावरून प्रवास करतात. सदर दस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत असल्याने रस्ता काम करणाºयांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चर्चा रंगत आहे. एकीकडे शासन लाखो रूपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे दर्जेदार कामे होत नसल्याने ग्रामीण भागात नागरिकांना रस्त्याअभावी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देअड्याळ-सालेवाडा रस्त्याचे प्रकरण : शेतकऱ्यांची होतेय दमछाक

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेवाडा मार्गातील नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्ते कामासाठी लाखो रूपये खर्च केले असताना अवघ्या चार महिन्यातच रस्त्याची दुरावस्था झाली असून शेतकऱ्यांना ऐन हंगामात कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यानंतर काही दिवसांनी रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र काम व्यवस्थित झाले नसल्याचे गावकºयातून ओरड आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालणे, असा गावकऱ्यातून सूर निघत आहे.मात्र काही कारणास्तवर अनेक शेतकरी, ग्रामस्थ याच रस्त्यावरून प्रवास करतात. सदर दस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत असल्याने रस्ता काम करणाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चर्चा रंगत आहे. एकीकडे शासन लाखो रूपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे दर्जेदार कामे होत नसल्याने ग्रामीण भागात नागरिकांना रस्त्याअभावी चांगलीच कसरत करावी लागत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अड्याळ ते सालेवाडा डांबरीकरण रस्ता.गत सहा महिन्यात अड्याळसह परिसरात बऱ्याच डांबरी रस्त्यांची कामे झाली. मात्र याचा दर्जा चांगला नसल्याची ओरड सुरू आहे. ग्रामस्थांची रस्त्याबाबत नेहमीच तक्रार सुरू असून याबाबत वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आले आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहे.कारवाई होत नसल्याने यामागचे गुपीत काय, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. लाखो रूपयांचा निधी खर्च होत असताना किमान एक वर्षतरी रस्त्याची गुणवत्ता कायम राहिली पाहिजे. मात्र अवघ्या दोन ते चारच महिन्यात रस्त्यावर खड्डे पडत असल्याने रस्ता काम गुणवत्तापूर्ण झाले आहे काय, असा प्रश्न नागरिकांतून अधिकाºयांना केला जात आहे.काहींच्या स्वार्थासाठी नागरिकांना त्रासशासन ग्रामीण भागातून नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी लाखो रूपयाचा निधी उपलब्ध करून देते. मात्र यंत्रणेतील काही अधिकारी, कंत्राटदार स्वत:च्या स्वार्थासाठी रस्ते काम दर्जेदार करीत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्याची सुरूवात आणि शेवटचे काम बऱ्यापैकी झाले. मात्र मध्यंतरी झालेली कामे निकृष्ठ दर्जाची असल्याचे चित्र स्पष्ट आहे. परिणामी रस्त्याची दूरावस्था झाली असतानाही संबंधित यंत्रणेला लक्ष देण्यासाठी वेळ नाही का, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभाग