शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमंदिर परिसरात रानडुकरांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:41 IST

मागील कही महिन्यांपासून रानडुकरांचे वास्तव्य शहराला लागून असलेल्या परिसरात आहे. अनेकांना दररोज विनोबा नगर व गोवर्धन नगरात रानडुक्कर फिरताना दिसतात.

ठळक मुद्देनागरिकांचा जीव धोक्यात : नवनिर्मित न्यायाधीश सदनिकांचा समावेश

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मागील कही महिन्यांपासून रानडुकरांचे वास्तव्य शहराला लागून असलेल्या परिसरात आहे. अनेकांना दररोज विनोबा नगर व गोवर्धन नगरात रानडुक्कर फिरताना दिसतात. गोवर्धन नगरात न्यायालयाची इमारत आहे. इमारत परिसरातच न्यायाधीशांकरिता सदनिकेची कामे सुरु आहेत. सध्या रानडुकरांनी आपला मोर्चा या सदनिकेत वळविला आहे. न्यायालय परिसरात दिवसभर शेकडो जणांची वर्दळ असते. वनविभागाचे कायम येथे दुर्लक्ष दिसत आहे.तुमसर शहरातील गोवर्धन नगर, विनोबा नगरातील रिकाम्या शेतशिवार असून तुरळक घर आहेत. नवीन वस्तीत घरे दूर दूर आहेत. रिकाम्या भूखंडावर झुडपी जंगल तयार झाले आहे. हनुमान तलाव व त्या समोरील रिकाम्या जागेवर लहान खुरटी झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. रानडुकरांनी या झुडपी जंगलात आपले सुरक्षित निवासस्थान तयार केले आहे. संध्याकाळी व पहाटे सर्वसामान्यांना रानडुकरांचा कळप येथे सहज पाहायला मिळतो. तामसवाडी मार्गपरिसर व गोवर्धन नगरातील घरासमोर रानडुक्कर सहज फिरताना दिसतात. सकाळी ८ ते ८.३० पर्यंत नागरिकांना रानडुकरांचे दर्शन झाले आहेत.तालुकास्तरीय न्यायालयाची इमारत विनोबा भावे मार्गावर आहे. न्यायालयाचा परिसर मोठा आहे. मुख्य न्यायालयीन इमारत व त्या बाजूस न्यायाधीश तथा कार्यालयीन कर्मचाºयाकरिता इमारतीचे बांधकाम सध्या सुरु आहे.नवनिर्मित इमारत परिसरात झुडपी जंगल तयार झाले आहे. या झुडूपात व इमारत परिसरात रानडुकरांनी आपला ठिय्या तयार केला आहे. सुरक्षित स्थळ, मानवी वर्दळ या ठिकाणी नसल्याने रानडुक्कर येथे सहज प्रवेश करतात. दिवसभर न्यायालयात मोठी गर्दी असते. येथे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाचे मात्र येथे कायम दुर्लक्ष दिसत आहे. झुडपी जंगलामध्येच रानडुक्कर पुन्हा जंगलात जाण्याची शक्यता कमीच आहे.विनोबा भावे बायपास रस्त्यावरून रात्री जाणे सध्या धोकादायक ठरत आहे. शहराबाहेर हा मार्ग असला तरी रात्री या मार्गावर वाहतूक सुरुच असते. न्यायालय परिसर असूनही सुरक्षेकरिता वनविभाग येथे गंभीर दिसत नाही. अपघात तथा दुर्घटनेनंतर येथे वनविभागाला जाग येईल काय? हाच मुख्य प्रश्न आहे.न्यायालय परिसरात झुडपी जंगलवजा झाडे असून तिथे मोकळी वाट आहे. येथे रानडुकरांचे वास्तव्य असू शकते. न्यायालय प्रशासनाने स्वच्छता केली होती. पुन्हा येथे लक्ष घालण्यात येईल.-अरविंद जोशी,वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.