शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील वृक्ष कटाई जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:03 IST

काही दशकापूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण तथा शहरी भाग आज वृक्षतोडीच्य प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे. इंधन उपलब्ध नसल्याने सरपणाकरिता, तसेच पहेला परिसरातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन गोसीखुर्द येथील धरणांतर्गत बाधीत झाल्याने त्या शेतजमिनीतील वृक्ष शेतकरी कंत्राटदारांना विकत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपहेला : काही दशकापूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण तथा शहरी भाग आज वृक्षतोडीच्य प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे. इंधन उपलब्ध नसल्याने सरपणाकरिता, तसेच पहेला परिसरातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन गोसीखुर्द येथील धरणांतर्गत बाधीत झाल्याने त्या शेतजमिनीतील वृक्ष शेतकरी कंत्राटदारांना विकत आहेत.इमारतीचे लाकूड व फर्निचर बनविण्यासाठी जंगलातील बहुमुल्य वृक्षांची कत्तल होत आहे. भंडारा तालुक्यात वृक्ष लागवड ही अत्यल्प असल्याने वृक्षतोडीच्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. ५० वर्षापूर्वी भंडारा तालुक्यात जळावू लाकडे मोठ्या प्रमाणात मिळत होती. आज ती मिळणे दुर्मिळ झाली आहेत. त्यात खापा, रावणवाडी, बोरगाव, एटेवाही, पागोरा, मिन्सी इत्यादी गावे जंगलात व्यापली आहेत.जंगलमाफिया, लाकूड ठेकेदार हे वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून वृक्षतोड करून पैसा कमावित आहेत. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे शासन वृक्षलागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. परंतु पाहिजे त्या प्रमाणात वृक्ष उभे दिसत नाही. ते फक्त कागदोपत्रीच दिसत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जंगल क्षेत्रात भटकंती केली तर हजारो वाळलेले वृक्ष भुईसपाट झालेली दिसत आहेत. वृक्ष कटाईवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. आजस्थितीत जंगलावर उपजिविका करणारी आणि अवैध वृक्षतोड करणारी माणसे बेधडक जंगलाचे वाळवंट करीत असून वाळलेल्या लाकडासह नवीन झाडेही तोडू लागली आहेत.

टॅग्स :forestजंगल