मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी संचारबंदी घोषीत करण्यात आली. मात्र या संचारबंदीत दोन जिल्ह्यांच्या सीमा सील असूनही बहाद्दर प्रवासी तुमसर तालुक्यात सीमा भेदून मालवाहू वाहनांतून दाखल होत आहेत. खापा चौफुलीवर हा प्रकार गत १५ ते २० दिवसांपासून सर्रास सुरू आहे.नागपूर शहर रेडझोनमध्ये आहे. प्रशासनाने दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. दोन जिल्ह्यांच्या सीमेवर व इतर स्थळी वाहनांची तपासणी केली जात आहे, परंतु तुमसर तालुक्यात खापा चौफुलीवर दररोज मालवाहू वाहनातून मजुरांचा लोंढा दाखल होत आहे. येथून ते मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे जात आहेत.दोन जिल्ह्याच्या सीमा भेदून प्रवाशी सर्रास मालवाहू वाहनातून प्रवास करताना नाकाबंदी दरम्यान त्यांची तपासणी होत नाही काय, त्यांचे वाहन कुठेच कसे अडविले नाही, त्या मजुरांची नोंद करण्यात आली काय, सीमा भेदून प्रवाशी वाहून नेणारे वाहन जिल्ह्याच्या सीमेत कसे आले, असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहेत.भंडारा जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने प्रशासनाने गंभीरतेने घेतले नाही. परंतू सोमवारी एका महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक थांबणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाला आत्मचिंतन न करण्याची गरज आहे.संचारबंदी काळात वाहतूक बंद, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा आदेश असताना मालवाहू वाहनांतून ३० ते ४० मजूर प्रवास करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमीका घेणे गरजेचे आहे.स्थानिक प्रशासन अनभिज्ञखापा चौफुलीवर दररोज येणारे मालवाहू वाहनातून मजुरांचा प्रवास सुरूच असून वाहन उभे करून मजूर त्यातून उतरतात. याची माहिती स्थानिक प्रशासनाला नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परप्रांतीय मजुरांना भोजनाची व्यवस्था करून आपली पाठ येथे थोपटून घेतली जात आहे. परंतु रेड झोनमधून येणाऱ्या मजुरांमुळे संक्रमणाचा धोका निश्चित वाढला आहे. प्रशासनाने येथे गंभीर दखल घेण्याची गरज आहे.
दोन जिल्ह्यांच्या सीमा भेदून मजुरांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST
दोन जिल्ह्यांच्या सीमा सील असूनही बहाद्दर प्रवासी तुमसर तालुक्यात सीमा भेदून मालवाहू वाहनांतून दाखल होत आहेत. खापा चौफुलीवर हा प्रकार गत १५ ते २० दिवसांपासून सर्रास सुरू आहे. नागपूर शहर रेडझोनमध्ये आहे. प्रशासनाने दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. दोन जिल्ह्यांच्या सीमेवर व इतर स्थळी वाहनांची तपासणी केली जात आहे, परंतु तुमसर तालुक्यात खापा चौफुलीवर दररोज मालवाहू वाहनातून मजुरांचा लोंढा दाखल होत आहे. येथून ते मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे जात आहेत.
दोन जिल्ह्यांच्या सीमा भेदून मजुरांचा प्रवास
ठळक मुद्देखापा चौफुलीवरील प्रकार : मालवाहू वाहनांतून तुमसरात दाखल, शासनाला आत्मचिंतनाची गरज