शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

जीवघेणा स्ट्रीट लाईटचा प्रवास

By admin | Updated: August 10, 2015 00:22 IST

जंगलव्याप्त भागात दावेझरी गाव असल्याने रात्री घराबाहेर पडताना वन्य प्राण्याची भीती नागरिकांत आहे.

खांबाला बटन आणि बल्ब : विजेचा धक्का लागण्याची भीतीचुल्हाड/सिहोरा : जंगलव्याप्त भागात दावेझरी गाव असल्याने रात्री घराबाहेर पडताना वन्य प्राण्याची भीती नागरिकांत आहे. यामुळे चक्क विजेच्या खांबाला बल्ब आणि बटन लावण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात हा विजेचा प्रवास गावकऱ्यांना जीवघेणा ठरणार असल्याची भीती आहे.सिहोरा परिसरातील जंगलात वन्य आणि हिंसक प्राण्यांचा मुक्त संचार आहे. या जंगललगत दावेझरी गावाचे वास्तव्य आहे. गावकऱ्यांना रात्री घराबाहेर निघताना वन्य प्राण्याची भीती आहे. गावात पथदिवे नसल्याने रात्री अंधारच अंधार राहत आहे. यामुळे गावकरी भयभीत आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी ग्रामसभेत हा गंभीर प्रश्न चर्चेला ठेवला आहे. या आशयाचे अनेक ठराव जिल्हा परिषदेला स्ट्रीट लाईट मंजुरीकरिता देण्यात आले आहेत. परंतु या प्रस्तावावर साधी चर्चा झाली नाही. ग्रामपंचायतला पत्रव्यवहार झालेला नाही. राज्य आणि केंद्र शासन स्मार्ट गावे करण्याची संकल्पना मांडत असताना विकासाचे अनेक प्रस्ताव थंडबस्त्यात गेले आहेत. बांधकामासाठी सगळीकडे बोंबा बोंब आहे. या गावात गावाला प्रकाशात ठेवणारी संकल्पना गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठेवण्यात आली आहे. त्याप्रमाणे संपूर्ण खांबाला बटन आणि बल्ब लावण्यात आले आहे. हे बटन आणि बल्ब सुरू करण्याची जबाबदारी वॉर्डातील काही नागरिकांची आहे.सायंकाळ होताच बल्ब सुरू करण्यात येत आहेत तर पहाटे हे बल्ब बंद करण्यास गावकरी पुढाकार घेत आहे. जमिनीपासून ५ फुट उंच खांबाला बटन आणि तारांची जोडणी करण्यात आली आहे. लहान मुले तथा बालकांचे बटनला स्पर्श होणार नाही, अशी काळजी घेण्यात आली आहे. उन्हाळा आणि हिवाळा या ऋतुत हा प्रयोग जीवघेणा नसला तरी, ऐन पावसाळ्यात बल्बचे बटन सुरू करताना भिती निर्माण झाली आहे. पाऊस सुरू असतानाही गावाला प्रकाशात ठेवण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु कुणी गंभीरतेने घेत नाही. सिहोरा परिसरातील अनेक गावात हाच प्रयोग अंमलात आणला जात आहे. या जीवघेणा प्रयोगात दोष जिल्हा परिषद की ग्रामपंचायतचा आहे हे कळेनासे झाले आहे. जिल्हा परिषदमध्ये दरवर्षी वाढीव स्ट्रीट लाईटचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या नियोजनाचा फायदा स्ट्रीट लाईट असणाऱ्या गावांना होत आहे. परंतु ज्या गावात आजवर स्ट्रीट लाईट पोहचली नाही अशा गावांना यात डच्चू देण्यात आले. सुकळी नकुल, गोंडीटोला गावे या सुविधेपासून वंचित आहेत. गावांना प्रकाशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावकरी असे जीवघेणे स्ट्रीट लाईटचे प्रयोग करीत आहेत. यामुळे या गावात जिल्हा परिषद अंतर्गत तात्काळ स्ट्रीट लाईट मंजूर करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)