या सभेचे अध्यक्षीय स्थान परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार यांनी भूषविले. याप्रसंगी प्रमुख अतिथी राज्य उपाध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, प्रा. शरद जाेशी, कार्याध्यक्ष प्रा. भगवान चाैधरी, राज्यसचिव प्रा. डाॅ. पितांबर ऊरकुडे, सहसचिव प्रा. सुनील राठाेड, काेषाध्यक्ष प्रा. स्मिता जयकर, सदस्य प्रा. प्रमाेद कारेमाेरे आदी उपस्थित हाेते.
गुगल मीटवर आयाेजित या ऑनलाईन सहविचार सभेत प्रा. डाॅ. सुधीर अग्रवाल अध्यक्ष नागपूर विभाग, प्रा. रविकांत जाेशी महासचिव नागपूर विभाग प्रा. सुरेश नारायणे राज्य उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. उमा बक्षी, प्रा. चंद्रशेखर गिरडे, प्रा. गजानन तितिरमारे, जे. आर. भेंडारकर, प्रा. सिध्दार्थ मेश्राम, प्रा. भाेजराम काेरे आदी उपस्थित हाेते. या सहविचार सभेला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा परिचय प्रा. चंद्रशेखर गिरडे यांनी केला.
या सहविचार सभेचे प्रास्ताविक प्रा. गजानन तितिरमारे यांनी केले. जिल्हा कार्यकारिणीचा परिचय प्रा. रवींद्र वाहाणे यांनी केला. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. सुमित पवार यांनी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषदेची यशस्वी वाटचाल व कोरोना संकट काळात परिषदेच्या माध्यमातून राबविलेले उपक्रम व त्यांचा विद्यार्थ्यांना झालेला फायदा, याशिवाय २७ नाेव्हेंबर, संविधान दिन व २५ जानेवारी मतदारदिन यासारख्या महत्वपूर्ण विषयावर विद्यार्थी व पालकांचे लक्ष केंद्रिंत करुन विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडविण्याचे महत्वपूर्ण प्रयत्न परिषदेचे सुरु असून याचे सर्व श्रेय राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेतील संपूर्ण पदाधिकाऱ्यांना राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांना जाते, असे विचार प्रा. सुमित पवार यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. युवराज खाेब्रागडे यांनी केले तर आभार प्रा. सिध्दार्थ मेश्राम यांनी मानले. याप्रसंगी भंडारा, गाेंदिया व नागपूर व राज्यस्तरावरील शिक्षक उपस्थित हाेते.