शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तामसवाडी घाटात जेसीबीने रेती खनन

By admin | Updated: March 31, 2016 00:51 IST

तालुका मुख्यालयापासून केवळ आठ कि.मी. अंतरावरील तामसवाडी रेती घाटावरून नियमबाह्यपणे व विनाक्रमांकांच्या जेसीबीने रेतीचे उत्खनन सुरु आहे.

मोहन भोयर तुमसर तालुका मुख्यालयापासून केवळ आठ कि.मी. अंतरावरील तामसवाडी रेती घाटावरून नियमबाह्यपणे व विनाक्रमांकांच्या जेसीबीने रेतीचे उत्खनन सुरु आहे. १० दिवसापूर्वी या रेतीघाटाचा लिलाव झाला. परंतु शासकीय सोपस्कार पूर्ण झाले नाही. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या रेती तस्करीमुळे लाखोंचा महसूल बुडत आहे. तुमसर तालुक्यातील तामसवाडी वैनगंगेचा नदी घाट उच्च दर्जाच्या रेती करिता प्रसिद्ध आहे. १० दिवसापूर्वी रेती घाटाचा लिलाव ७६ लाखात झाल्याची माहित आहे. याप्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना विचारल्यावर तुम्हाला प्रत्येक बाब सांगण्यास मी बांधील नाही, असे उत्तर दिले. मागील २० ते २२ दिवसांपासून तामसवाडी रेती घाटातून अवैधरीत्या नियमबाह्य जेसीबीने रेतीचे उत्खनन सर्रास सुरु आहे. मध्यरात्री जेसीबी नदी पात्रात नेली जाते. पहाटे ५ ते ५.३० पर्यंत रेतीचा उपसा केला जातो. ट्रक व ट्रॅक्टर भरून ही रेती नेली जाते. दिवसभर रेती उत्खनन बंद ठेवण्यात येते. जेसीबी नदी काठावर आणून ठेवली जाते. मागील २० दिवसांपासून हा नित्यक्रम सुरु आहे. नदीकाठावर एक झोपडी तयार करण्यात आली आहे. या झोपडीत तीन ते चार युवक राहतात. झोपडी शेजारी पाण्याचा एक ट्रॅक्टरसुद्धा येथे ठेवण्यात आला आहे. झोपडीची जागा झुडपी जंगलात मोडते असे समजते. काय आहे गोम ?नागपूर महानगर पालिकेच्या चार नगरसेवकांनी मनसर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट पुल बांधकाम व सिमेंट रस्त्याचे कंत्राट घेतले आहे. याकरिता ३५ ते ४० हजार ब्रास रेतीची गरज पडत आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, बेटाळा, वारपिंडकेपार व तामसवाडी या रेती घाटांवरूनच ही रेती नेण्यात येणार आहे. काही घाटावरून ती सध्या नेली जात आहे. तामसवाडी येथील रेतीघाट लिलाव झाल्यावर १० दिवसापेक्षा जास्त काळ झाला तरी येथे संबंधित कंत्राटदाराने रक्कम भरली नाही. नदीपात्रातून जेसीबीने दुसरा रेती उत्खनन करण्याची हिंमत करू शकेल काय? हा प्रश्न उपस्थित होते.