शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

जयंत पाटील यांनी वाहनाचे केले स्वत: सारथ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

भंडारा : राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यात दिवसभर सभा, बैठकांसोबत जनतेशी संवाद असा दिनक्रम. सोबतच्या युवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधता ...

भंडारा : राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यात दिवसभर सभा, बैठकांसोबत जनतेशी संवाद असा दिनक्रम. सोबतच्या युवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा, म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहनाचे स्वत: सारथ्य केले. नागपूर जिल्ह्यातील भिवापूरपासून ६० किलोमीटरचा प्रवास करीत भंडारा गाठले. या दोन तासांत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर परिवार संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात ही परिसंवाद यात्रा सध्या पूर्व विदर्भात आहे. या दौऱ्यात दिवसभर पक्षाचा आढावा, सभा आणि पदाधिकाऱ्यांसोबत जनतेच्या भेटीगाठी असा दिनक्रम असतो. शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे सभा आटोपून जयंत पाटील भिवापूर येथे पोहोचले. तेथून त्यांना भंडाऱ्याकडे निघायला मध्यरात्र उलटली होती. दुसऱ्या दिवशी भंडाऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ते भिवापूरवरून भंडाऱ्याकडे निघाले. मात्र, यावेळी त्यांनी स्वत: स्टेअरिंगचा ताबा घेतला. तब्बल दोन तास वाहन चालवित पहाटे भंडाऱ्यात पोहोचले.

या दोन तासांच्या प्रवासात त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर युवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. भंडाऱ्यात पहाटे पोहोचल्यानंतर सकाळी ६ वाजता ते नियोजित कार्यक्रमाच्या तयारीला लागले आणि ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसंपदा विभागाची आढावा बैठकही घेतली. त्यांनी स्वत: वाहनाचे सारथ्य करून युवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याने, युवा टीम चांगलीच प्रभावित झाली.