शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा कीटसाठी भंडारात ‘जत्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:49 IST

अटल विश्वकर्मा बांधकाम कामगार योजनेची कीट मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत असून गत आठवडाभरापासून येथील साई मंदिर परिसरात बांधकाम कामगारांची जत्राच भरली आहे. कोणतीही सुविधा आणि माहितीचा अभाव असल्याने दररोज येथे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. सोमवारी प्रचंड गर्दी झाल्याने या मार्गावरील वाहतुकही ठप्प झाली होती. तर किट मिळविण्यासाठी अनेक कामगार ‘मंगल’ कार्यालयाच्या फाटकावरुन चढून जात असल्याचे दृष्य होते.

ठळक मुद्देदररोज गोंधळ : गावागावांतून आलेले बांधकाम कामगार त्रस्त, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अटल विश्वकर्मा बांधकाम कामगार योजनेची कीट मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत असून गत आठवडाभरापासून येथील साई मंदिर परिसरात बांधकाम कामगारांची जत्राच भरली आहे. कोणतीही सुविधा आणि माहितीचा अभाव असल्याने दररोज येथे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. सोमवारी प्रचंड गर्दी झाल्याने या मार्गावरील वाहतुकही ठप्प झाली होती. तर किट मिळविण्यासाठी अनेक कामगार ‘मंगल’ कार्यालयाच्या फाटकावरुन चढून जात असल्याचे दृष्य होते.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक कीट व सुरक्षा किट नि:शुल्क वितरीत केली जात आहे. याचा अधिकृत उद्घाटन सोहळा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी भंडारातील दसरा मैदानावर पार पडला. मात्र त्यापुर्वीपासून येथील जिल्हा परिषद मार्गावरील साई मंगल कार्यालयात किट वितरण केली जात आहे.जिल्हाभरातील नोंदणीकृत कामगार या ठिकाणी टोकन घेऊन कीट स्वीकारण्यासाठी येत आहे. परंतु येथे नियोजनाचा प्रचंड अभाव दिसत आहे. कामगार आयुक्त कार्यालयाच्या अगदी समोर हजारो कामगार सुरक्षा किटसाठी झुंबळ करुन आहेत. गत काही दिवसांपासून गावागावांतून कामगार याठिकाणी येतात. सकाळपासूनच येथे रांग लागलेली असते. १० वाजताच्या सुमारास वितरणाला प्रांरभ होतो. मात्र गोंधळामुळे अनेकदा वितरण खोळंबते. परिणामी कामगार संतप्त होतात. गोंधळ वाढत जातो. त्याचा परिणाम परिसरात राहणाऱ्यासोबत या मार्गावरील वाहतुकीलाही होत आहे.जिल्ह्यात ३०हजार कामगारांची नोंद झाली आहे. या कामगारांना कीट वितरणासाठी जिल्ह्यात केवळ एकमेव केंद्र उघडण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वितरण केंद्र उघडले असते तर कामगारांना मनस्ताप सहन करावा लागला नसता. जिल्ह्याच्या टोकावरुन कामगार सकाळपासूनच भंडारा शहरात दाखल होतात. रोजमजुरी बुडवून आठ-आठ दिवस येथे सुरक्षा कीटसाठी गर्दी करुन असतात. दररोज भंडारात यावे लागत असल्याने आर्थिक फटका बसतो. महिलांची संख्या मोठी आहे. दिवसभर उन्हात ताटकळत असतात. मात्र याठिकाणी त्यांना कुणीही योग्य मार्गदर्शन करीत नाही. कामगार कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर दररोज हा प्रकार घडत असतांना आयुक्त मात्र यावर तोडगा काढण्यास तयार नाही.सोमवारी सकाळपासूनच सुरक्षा किटसाठी मोठी गर्दी झाली होती. कोणतीही व्यवस्था नसल्याने मंगल कार्यालयाच्या गेटवरुन अनेकजण चढून जाऊन किट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. तर काही कामगार रांग लावून आपल्या क्रमांकाची प्रतीक्षा करीत होते. या कामगारांना तालुका ठिकाणी सुरक्षा किट वितरण करावे अशी मागणी येथे असलेल्या कामगारांनी केली.साई मंदिर मार्गावर वाहतूक विस्कळीतजिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या तुमसर मार्गावर असलेल्या मंगल कार्यालयात सुरक्षा किट वितरण सुरु आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. त्यातच एका बाजुने बांधकाम सुरु असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. मंगल कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात कामगारांची गर्दी आणि त्यांची वाहने उभी राहत असल्याने वाहतुक ठप्प होते. सोमवारी दुपारी १२ वाजता याठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. वाहतूक नियंत्रणासाठी साधा पोलीसही त्याठिकाणी उपस्थित नव्हता.नगरपरिषदेतही उडाली झुंबडबांधकाम कामगारांची नोंदणी नगर परिषदेत होत असल्याची माहिती कुणीतरी पसरविली आणि सोमवारी सकाळी ११ वाजतापासून नगर परिषदेत नोंदणीसाठी कामगारांची झुंबड उडाली. नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कामगार अधिकाºयाच्या कार्यालयापर्यंत पाय ठेवायला जागा नव्हती. कामगार नोंदणीची ही माहिती कुणी दिली याबाबत सर्वजण अनभिज्ञ दिसत होते. कामगारांना नोंदणीबाबत कामगार कार्यालयाकडून योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप होत आहे.