शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवाराने मोहाडीत घडविली जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 21:49 IST

मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाने जलक्रांती घडविली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचे नियोजन, व्यवस्थापन व ताळेबंद निर्माण करण्यात या अभियानाने महत्वाची भूमिका बजावली आहे. २२३ कामांपैकी २०० कामे पूर्ण झाली असून १२ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे मोहाडी तालुक्यात जलक्रांती झाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे२२३ कामांपैकी २०० कामे पूर्ण : नियोजित कालावधित काम पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाने जलक्रांती घडविली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचे नियोजन, व्यवस्थापन व ताळेबंद निर्माण करण्यात या अभियानाने महत्वाची भूमिका बजावली आहे. २२३ कामांपैकी २०० कामे पूर्ण झाली असून १२ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे मोहाडी तालुक्यात जलक्रांती झाल्याचे दिसत आहे.या साठलेल्या पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी होवून मोठ्या प्रकल्पांची गरज आता संपल्यात जमा होतांना दिसत आहे. २०१७-१८ या वर्षात मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ६ विभागांमार्फत २२३ कामे प्रस्तावितकरण्यात आली. मोहाडी तालुक्यासाठी जलयुक्त शिवार सुक्ष्म व लघुसिंचनाचे जाळे निर्माण करण्यात मोलाचे ठरले आहे. २०१५ पासून या अभियानांतर्गत झालेल्या कामांमुळे कायमस्वरुपी जलसाठे निर्माण झाले. दुर्लक्षित साठ्यांचे पुनर्निर्माण व मजबुतीकरण करण्यात आले.२०१७-१८ या वर्षात कृषी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, वनविभाग, जलसंधारण व भूजल सर्व्हेक्षण विभागामार्फत प्रस्तावित २२३ कामांसाठी राज्य शासनाचे वतीने ५४०.४७ लाखाच्या निधीला मंजुरी दिली. आता पर्यंत या कामांसाठी ११९.८४ लाखांची देयके कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात कामे पुर्ण झाल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.कृषी विभागाची कामगिरी२०१७-१८ मध्ये कृषी विभागामार्फत ७४ कामांसाठी १३१.४० लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. यापैकी ७१ कामे पूर्ण झाली तर २ कामे प्रगतीपथावर आहेत. १ कामाची माहिती नाही. झालेल्या कामासाठी आतापर्यंत ५.८० लाखांची देयके देण्यात आली. या कामांमध्ये सिमेंट नाला बांध ३ कामे, सिमेंट बंधारा दुरुस्ती १७, वळण बंधारा दुरुस्ती १, नाला खोलीकरण ३५, मजगी १, मजगी पुनर्जीवन १, बोडी नूतनीकरण ५, शेततळे ३ अशा ७४ कामांचा समावेश आहे.जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागजिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या १६ कामांसाठी २६०.२० लाखाच्या निधीला मान्यता देण्यात आली. त्यापैकी १२ कामे पूर्ण झाली तर ४ कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत ६१.१५ लाखाचा निधी कंत्राटदारांना देण्यात आला. या कामांमध्ये सिमेंट नाला बांध ४, सिमेंट प्लग बंधारा दुरुस्ती २, केटीवेअर दुरुस्त २, लघु तलाव दुरुस्ती ३, मामा तलाव दुरुस्ती ५ कामांचा समावेश आहे.भूजल सर्वेक्षण विभागातर्फे रिचार्ज शापपंचायत समितीला मजगी पुनर्जीवनाच्या ५८ कामांसाठी २०.३३ लाखाच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ५७ कामे पूर्ण झाली असून त्यावर १४.७ लाखाचा निधी खर्च करण्यात आला. १ कामाची माहिती नाही. भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने रिचार्ज शापच्या १५ कामांसाठी १२.४५ लाखाच्या निधीला मंजुरी देण्यात आली. सर्व कामे पूर्ण झाली असून ११.९४ लाखाचा निधी खर्च करण्यात आला.वनविभाग व जलसंधारण विभागवनविभागामार्फत एकुण ५८ कामांसाठी ६६.१५७ लाखाच्या निधीला मंजुरी देण्यात आली. यापैकी ४९ कामे प्रत्यक्ष सुरु करण्यात आली असून ४४ कामे पूर्ण झाली. या कामांवर ५.७५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला ९ कामांची माहिती नाही. झालेल्या कामांमध्ये डी.प.सी.सी.टी. ४० कामे, पाणी साठवण तलाव ११, नाला सरळीकरण व खोलीकरण ५, सिमेंट बंधारे २ यांचा समावेश आहे. जलसंधारण विभागामार्फत २ कामांसाठी ४९.९३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला.