शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नाला खोलीकरण ठरला शेतकऱ्यांसाठी जलसंजीवनी

By admin | Updated: September 21, 2016 00:31 IST

१,२१९ लोकसंख्येच्या दावेझरी येथील लोकांचा शेती करणे हाच मुख्य व्यवसाय आहे.

दावेझरी येथे पीक डौलात : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गतचा यशस्वी प्रयोगभंडारा : १,२१९ लोकसंख्येच्या दावेझरी येथील लोकांचा शेती करणे हाच मुख्य व्यवसाय आहे. या गावात खरीप हंगामात भात व बांधावर तूर पिके घेतली जातात. रब्बी हंगामात गहू, लाखोरी, हरभरा पिकाची लागवड केली जाते. दावेझरी येथील तुकाराम शहारे, रामदास वाहणे, पृथ्वीराज कटरे यांच्याकडे ०.८० हेक्टर कोरडवाहू शेती असून पावसाच्या पाण्यावर भात व तूर पिके घेतले जात होते. परंतु त्यांची शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे एखाद्यावर्षी पाऊस कमी झाला तर भाताचे पीक लागवड करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांना नेहमी दुष्काळजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागत असे, अशा स्थितीमध्ये त्यांना कर्ज काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत असे. दावेझरी पाणलोट समितीमध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत मजगी, पुनरूज्जीवन व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरण, दुरूस्ती ही कामे करण्यात आली. त्यामध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून तीन शेततळे व ८.२५ हेक्टर क्षेत्रात मजगी पुनरूज्जीवन २९.१३ हेक्टरवर करण्यात आले. यावर्षात पाऊस तुरळक प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्यांनी वसुंधरा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरण केले. त्यामुळे साठलेल्या पाण्याचा उपयोग करून धान रोवणीकरीता शेतात पाणी सोडण्यास सुरूवात केली, आणि पाहतापाहता आठ हेक्टर शेती ओलित करून धानाची लागवड केली.या नाला खोलीकरणाचे वैशिष्टय म्हणजे पहिल्या पावसात नाल्याचे पात्र पुर्ण भरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नर्सरी लवकर तयार करुन हंगामात पावसात खंड पडून देखील शेतालगतच्या नाला खोलीकरण व जुन्या सिमेंट नाला बांध दुरूस्तीमुळे पाणी संचय करून लगतच्या शेतकऱ्यांनी इलेक्ट्रीक इंजिन व डिझेल इंजिन बसवून धान रोवणीकरीता पाण्याचा उपयोग केला. शेतकरी शेतालगत तयार करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या शासनाच्या कामावर समाधानी आहेत. पाण्याची भीषण टंचाई असतानासुध्दा त्यांना इतरत्र न भटकता वेळोवेळी पाण्याची गरज भागविता आली. जलयुक्त शिवारच्या कामामुळे येथील शेतकऱ्यांचा गहू व हरभरा लागवड करण्याचा मानस आहे. यामाध्यमातून आर्थिकस्तर उंचावण्यासाठी तुकाराम शहारे, रामदास वाहणे, पृथ्वीराज कटरे यांच्यासह सहा शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवारांतर्गत केलेले नाला खोलीकरण जलसंजीवनीच ठरली आहे. (शहर प्रतिनिधी)या नाला खोलीकरणावर २ लाख ४५,५१७ इतका निधी खर्च करण्यात आला असून सरासरी ३२० मीटर लांबीचे नाला खोलीकरण करण्यात आले. याचा वापर भात पिकाला पाणी देण्यासाठी करण्यात येत असून त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पावसाच्या पाण्याअभावी पीक जाण्याची भीती राहिली नाही.- बी.एम. समरीत, कृषी सहाय्यक, सिहोरा, ता. तुमसर.