शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

रक्तदानासाठी जयदीपची सायकल भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:57 IST

फुटबॉल खेळताना अपघात झाला. एक तरुण मृत्यूच्या दारात पोहचला. त्यावेळी रक्ताची अत्यंत गरज होती. मात्र जेथे कुटुंबियांनीच नकार दिला तेथे दुसऱ्यांचे काय? अशा परिस्थितीत एका रक्तपेढीने पुढाकार घेत त्याला रक्त उपलब्ध करुन दिले आणि तेथून सुरु झाला त्याच्या रक्तदान चळवळीचा प्रवास.

ठळक मुद्देदेशभर करणार प्रसार : पश्चिम बंगालच्या तरुणाचा १३ राज्यात प्रवास

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : फुटबॉल खेळताना अपघात झाला. एक तरुण मृत्यूच्या दारात पोहचला. त्यावेळी रक्ताची अत्यंत गरज होती. मात्र जेथे कुटुंबियांनीच नकार दिला तेथे दुसऱ्यांचे काय? अशा परिस्थितीत एका रक्तपेढीने पुढाकार घेत त्याला रक्त उपलब्ध करुन दिले आणि तेथून सुरु झाला त्याच्या रक्तदान चळवळीचा प्रवास. जयदीप राऊत असे या अवलीयाचे नाव असून पश्चिम बंगालचा हा तरुण चक्क सायकलने भारतभर भ्रमंती करीत रक्तदानासाठी नागरिकांना प्रेरीत करीत आहे.साकोली या राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी सायकलवरून एक तरुण आला. सायकलला तिरंगा झेंडा आणि समोर एक फलक लावलेल्या या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अधिक चौकशी केली तेव्हा हा तरुण रक्तदान चळवळीसाठी स्वत:ला वाहून घेतलेला निघाला. पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्यातील जयदीप राऊत हा तरुण आपल्या सायकलने भारतभर भ्रमंती करीत आहे. फुटबॉल खेळत असताना त्याला जबर दुखापत झाली. त्यावेळी चार बॉटल रक्ताची त्याला आवश्यकता होती. परंतु त्याच्या कुटुंबियांनी रक्त देण्यास नकार दिला. अखेर एका रक्तपेढीच्या पुढाकाराने त्याला जीवदान मिळाले. स्वत:वर ओढवलेल्या या संकटाने त्यांना रक्तदानाचे महत्व कळले. हीच बाब देशवासीयांना कळावी म्हणून पुढाकार घेतला. गत चार महिन्यांपासून ते सायकलने भारतभर फिरत आहेत.झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि आता तो महाराष्ट्रात पोहचला आहे. आतापर्यंत नऊ राज्यात पाच हजार किलोमीटर सायकलने प्रवास केला आहे. साकोली येथे लहरीबाबा मठात उपस्थितांना रक्तदानाविषयी त्यांनी प्रेरित केले. यावेळी डॉ.केशव कापगते, डॉ.भास्कर गायधने, डॉ.अमोल बडवाईक, डॉ.अजय तुमसरे, डॉ.रवींद्र कापगते, डॉ.छाया कापगते, डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विदर्भात मिळाला उत्तम प्रतिसादजयदीप राऊत हा मुंबई, नाशिक, औरंगाबाद मार्गे विदर्भात दाखल झाला. अकोला, अमरावती, नागपूर असा प्रवास करीत तो भंडारा जिल्ह्यात दाखल झाला. या मोहीमेत ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाने आपली आस्थेने चौकशी करून कोणतीही अडचण येऊ दिली नाही. रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा असे सांगतो.