शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या ‘जय हिंद’ ग्रुपने गोळा केला शहीद निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:45 IST

विद्यार्थ्यांवर संस्काराची जबाबदारी असलेल्या संवेदनशिल शिक्षकांनी पुलवामा हल्ल्यानंतर एकत्र येवून जय हिंद ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल एक लाख २ हजारांचा निधी गोळा केला. हा निधी बुलढाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे. या शिक्षकांच्या देश प्रेमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्दे१०२ शिक्षकांचा सहभाग : शहीद संजय राजपूत व नितीन राठोड यांच्या परिवाराला देणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विद्यार्थ्यांवर संस्काराची जबाबदारी असलेल्या संवेदनशिल शिक्षकांनी पुलवामा हल्ल्यानंतर एकत्र येवून जय हिंद ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल एक लाख २ हजारांचा निधी गोळा केला. हा निधी बुलढाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे. या शिक्षकांच्या देश प्रेमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक जितेंद्र बुंदेले, योगेश पुडके, गणेश सार्वे यांनी पुलवामा हल्ल्यानंतर एकत्र येवून शहीदांचा कुटुंबियाना मदत करण्याचा निर्धार केला. त्यासाठी जयहिंद नावाचा ग्रुप तयार केला. सर्व शिक्षकांना स्वेच्छेने मदत देण्याचे आवाहन केले.जिल्ह्यातील १०२ प्राथमिक शिक्षकांनी यात भरघोष मदत केली. या ग्रुपकडे एक लाख दोन हजार रुपयांचा निधी तयार झाला. शहीद कुटुंबीयांना खारीचा वाटा म्हणून शिक्षकांच्या या ग्रुपच्या वतीने मदत केली जाणार आहे. शहीद संजय राजपूत आणि शहिद नितीन राठोड यांच्या कुटुंबियाना हा निधी दिला जाणार आहे.पवनीच्या शहिदाच्या पित्याने घडविला आदर्शप्राथमिक शिक्षकांच्या जयहिंद ग्रुपने गोळा केलेल्या निधीतील ३० हजार रुपयांचा धनादेश एका समारंभात पवनी येथील शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचे वडील अंबादास मोहरकर यांना देण्यात आला. अंबादास मोहरकर यांनी हा निधी सन्मानपूर्वक स्विकारल्यानंतर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांना हे तीस हजार रुपये देण्याची इच्छा व्यक्त करीत सदर धनादेश जयहिंद गु्रपच्या सुपुर्द केला. देशासाठी लढलेल्या प्रफुल्लच्या वडीलांच्या या निर्णयाने सर्व शिक्षक नतमस्तक झाले. रविवारी झालेल्या या सोहळ्याला रमेश सिंगनजुडे, जीत बुंदेले, गणेश सार्वे, योगेश पुडके, मुकूंद ठवकर, हरिकिसन अंबादे, सुनील निनावे, देवानंद घरत, प्रमोद घमे, कुसूम लांबट, एन. एम. धकाते, व्ही. एम. जगनाडे, डी. एम. उरेकर, बी. जे. अंबादे, किशोर ईश्वरकर, राजू नानोटी, एन. ए. तुरकर, सिध्दार्थ चौधरी, रामधन धकाते, यु. आर. राठोड आदी उपस्थित होते.