शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जयभीमच्या गजराने आसमंत दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:03 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणूक काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. जयभीमच्या गजराने आसमंत दणाणून गेले होते. येथील त्रिमुर्ती चौकातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देमिरवणूक : आबालवृद्धांचे बाबासाहेबांना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणूक काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. जयभीमच्या गजराने आसमंत दणाणून गेले होते. येथील त्रिमुर्ती चौकातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.भंडारा शहरासह जिल्हाभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह दिसत होता. प्रत्येक गावांत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आणि सायंकाळी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा शहरातही सकाळपासून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उत्साह दिसत होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास मोटारसायकल रॅली काढण्यात आली. हातात पंचशील ध्वज घेतलेली तरुण-तरुणी या रॅलीत सहभागी झाले होते. बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार केला जात होता. शहरातील विविध मार्गावरुन या रॅलीने मार्गक्रमण केले.शहरातील त्रिमुर्ती चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्याचे दिसत होते. श्वेत वस्त्र धारण करुन प्रत्येकजण बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येत होते. सायंकाळी नाशिकनगर परिसरातून अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध देखावे साकारण्यात आले होते. जयभीमच्या गजरात ही मिरवणूक शहरातील विविध मार्गातून त्रिमुर्ती चौकात पोहचली. या रॅलीमध्ये शहरातील विविध भागातील रॅली येवून सहभागी झाल्या होत्या.देखणे देखावेएका देखण्या रथात बाबासाहेब आणि माता रमाईचा जीवंत देखावा साकारण्यात आला होता. जणू बाबासाहेबच या रथात विराजमान असल्याचे भासत होते. संविधानाची प्रतिकृती, यासह बाबासाहेबांच्या विचारावर आधारीत देखावे या रॅलीत साकारले होते.