शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आला पावसाळा आता आपले आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

बॉक्स रस्त्यावरील अन्न खाणे शक्यतो टाळा अनेकदा रस्त्यावरील वडापाव, समोसे, तळलेले पदार्थ, मिठाई, चीज, पनीरसोबतच मांसाहारी पदार्थ खाणे शक्‍यतो ...

बॉक्स

रस्त्यावरील अन्न खाणे शक्यतो टाळा

अनेकदा रस्त्यावरील वडापाव, समोसे, तळलेले पदार्थ, मिठाई, चीज, पनीरसोबतच मांसाहारी पदार्थ खाणे शक्‍यतो टाळावे. हे पावसाळ्यात टाळण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी चातुर्मासाची संकल्पना पुढे आणली. श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याची पद्धत यातूनच रूढ झाली आहे. याचा बारकाईने विचार केल्यास जड अन्न न खाता पचनास हलके तसेच उपवासाच्या निमित्ताने कमी करण्याचा संदेश दिला आहे.

बॉक्स

पावसाळ्याच्या दिवसात हे खाणे टाळावे...पावसाळ्यात विशेषत; रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ तसेच मीठ जास्त असलेले पदार्थ सॉफ्टड्रिंक, थंड पेय, चायनीज सारखे पदार्थ खाणे हे शरीरासाठी केव्हाही घातकच ठरते. यातूनच आपण आजाराला आमंत्रण देत असतो. यासोबतच पावसाळ्यात तेलकट पदार्थ खाण्यावर नियंत्रण हवे. पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद होतो. म्हणूनच या काळात कमी आहार करणे गरजेचे असते. पचन संदर्भातील आजार टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे.

बॉक्स

पावसाळ्याच्या दिवसात हे खावे...

पावसाच्या दिवसात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, यासाठी संध्याकाळी लवकर जेवावे. त्यामुळे पचन सुलभ होते. विशेषत: आहारामध्ये जांभळे, मक्याचे भुट्टे, रानभाज्या, घरचे जेवणात वरण-भात-भाजी-पोळी, ताजे अन्न नक्कीच सुरक्षित. सोबतच पोळी, भाकरी, थालीपीठ, पराठे जास्त खावेत. नाचणी, शिंगाडा, हातसडीचा तांदूळ याचाही आहारामध्ये समावेश करता येईल.

कोट

प्रतिकारशक्ती व पचनसंस्थेची ताकद वाढविणारे अन्नपदार्थ पावसाळ्यात नेहमीच उपयुक्त ठरतात. पावसाळ्यात आल्याचा चहा किंवा दुधात हळद घालून घेणे हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. या काळात आहार कमीच घ्यायला हवा.

डॉ.दिलीप गिऱ्हेपुंजे,

तज्ज्ञ

कोट

भंडारा जिल्हा हा नैसर्गिक विपुलतेने समृद्ध आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात शेतशिवारात अनेक रानभाज्या सहज उपलब्ध होतात. यातून शरीराला आवश्यक घटक मिळत असल्याने नागरिकांनी आवर्जून रानभाज्या खाणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांना रोजगारही मिळू शकतो.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.