भंडारा : विदर्भात नवतपा चांगलाच तापत आहे. मागील चार दिवसांपासून भंडाऱ्यात पारा वाढत आहे. शनिवारला भंडाऱ्यात ४५.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. सोमवारपासून नवतपाला सुरुवात झाली आहे. यासोबतच सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे सकाळी ८ वाजता भंडाऱ्यातील पारा ४५.५ अंशावर पोहोचला. सध्या उष्णतेच्या या लाटेने जिल्हावासीय होरपळून निघाले आहेत. सकाळपासूनच उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असून दुपारच्यावेळी रस्ते सामसूम होत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
नवतपा तापतोय ! भंडारा @ ४५.५
By admin | Updated: May 31, 2015 00:38 IST