शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालन व्यवसायातून शेतकऱ्यांचा विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:23 IST

पशुपालक व शेतकरी यांचे आर्थिक स्त्रोताचे पशुपालन व्यवसाय मुख्य घटक आहे. या व्यवसायातून अनेक जण प्रगतीचे शिखरावर पोहचली असली तरी पशुधनाच्या संख्येने जलद गतीने होणारी घट चिंता निर्माण करणारी आहे. येत्या काही वर्षात केवळ चित्रावरच पशुधन दिसणार असल्याने शेतकऱ्यांनी पशुधनाची जोपासना व संगोपन करण्याची आश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी केले.

ठळक मुद्देधनेंद्र तुरकर : सोनेगाव येथे पशुपालन कृती शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : पशुपालक व शेतकरी यांचे आर्थिक स्त्रोताचे पशुपालन व्यवसाय मुख्य घटक आहे. या व्यवसायातून अनेक जण प्रगतीचे शिखरावर पोहचली असली तरी पशुधनाच्या संख्येने जलद गतीने होणारी घट चिंता निर्माण करणारी आहे. येत्या काही वर्षात केवळ चित्रावरच पशुधन दिसणार असल्याने शेतकऱ्यांनी पशुधनाची जोपासना व संगोपन करण्याची आश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी केले.सोनेगाव येथील ग्रामपंचायत प्रांगणात पशु वैद्यकीय दवाखाना सिहोरा अंतर्गत आयोजित जनावरांचे कृती शिबिरात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनमाला चांदेवार होत्या. उद्घाटन सभापती धनेंद्र तुरकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उमेश फुंडे, सिहोराचे सरपंच मधु अडमाचे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. देशेट्टीवार, धनलाल चौहान, डॉ. टेकाम, डॉ. विजय झोडे, डॉ. प्रदिप तुमसरे उपस्थित होते.कामधेनू दत्तक ग्रामने घोषित करण्यात आलेल्या सोनेगावात आयोजित जनावरांचे कृती शिबिरात २४७ जनावरांची तपासणी करण्यात आली. या जनावरांचे पशुपालकांना औषध आणि मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात वंधत्व जनावराची तपासणी, औषधी उपचार, खच्चीकरण, लसीकरण, गोचीळ निमूर्लन, औषध फवारणी, जंतनाशक औषधी आदी शेतकरी आणि पशु पालकांना वितरीत करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस गावातील सहा पशुपालकांना सभापती धनेंद्र तुरकर यांचे हस्ते करण्यात आले. वैरण बियाणे, युट्रिकॉल, क्षारवित, क्षार, मिश्रण, मलमूत्र व्यवस्थापन अंतर्गत कल्चर, या करिता युरिया किट आदींचे पशुपालकांना वाटप करण्यात आले. यावेळी महिला पशु पालकांना सन्मानित करण्यात आले. गावात पशु पालन आणि दुग्ध व्यवसायातून आर्थिक विकास करण्यासाठी जनतेकरीता शासनस्तरावर अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. जनावराचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शासनस्तरावर पशु दवाखाने कार्यरत आहे. पशुपालक आणि शेतकरी यांना हा व्यवसाय महत्वाचे असून पशुधनाचे संख्येत वाढ करण्याची गरज असल्याचे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने पशुपालक व शेतकरी उपस्थित होते. संचालन डॉ. विजय झोडे यांनी तर, आभार प्रदर्शन डॉ. प्रदिप तुमसरे यांनी केले.