लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : शेतकरी आपला पोशिंदा आहे. विकेल तर आपण टिकू. बालकांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण करा. आपण तयार केलेली प्रतिकृती वर्तमान घडामोडीनुरूप आहे का, याचा पडताळणी करून पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यापनादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये सृजनशिलतेचे विचार रूजविण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लक्ष्मण पाच्छापुरे यांनी केले.महाराष्ट्र विद्या प्राधीकरण पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवीनगर नागपूर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामविकास हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय कोंढी - जवाहरनगर येथील ४४ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०१९ चे समारोपीय बक्षिस वितरणाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव राजकुमार गजभिये होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) विजयकांत दुबे, उपशिक्षणाधिकारी (निरंतर) जगन्नाथ शिवसरण, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, अधीक्षक माध्यमिक मेश्राम, पंचायत समितीचे सदस्य अनिल वसानी, ठाणा केंद्र प्रमुख वसंत साठवणे, संस्थापक अध्यक्ष वासुदेवराव गजभिये, चितेश पोपट, प्राचार्य एस.एस. शेंदरे, मुख्याध्यापक पी.एस. नागदेवे उपस्थित होते.तत्पूर्वी विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थिनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे शाळा निहाय अवलोकन केले. येथे उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, प्रयोगशाळा परिचर, सहाय्यक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची शैक्षणिक साहित्य स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ.एल.पी. नागपुरकर, एस.पी. कुरेशी, डॉ.राजीव मेश्राम होते. यशस्वी विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यात वर्ग ६ ते ८ उच्च प्राथमिक विद्यार्थी गटात जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान लाखनी येथील समर्थ विद्यालय येथील वर्ग सातवीचा विद्यार्थी वंश देशपांडे यांच्या सोलर हायड्रोपॉवर प्लाँटला मिळाला. बेला येथील महर्षी विद्या मंदिरची वर्ग आठवीची विद्यार्थिनी स्नेहल अतकरी होत्या. युटीलाईझेशन आॅफ प्लास्टीक गॉरवेजला दुसरा, तर आंधळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुलची वर्ग आठवीची विद्यार्थिनी सेजल मोहतुरे हिच्या भूकंपाचे सूचना यंत्राला तिसरा पुरस्कार मिळाला.वर्ग ९ ते १२ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यार्थी गटामधून जिल्ह्यामधून प्रथम वैनगंगा विद्यालय पवनी येथील वर्ग नववीची आयुषी धावडे यांच्या वेस्ट मॅनेजमेंट प्रतिकृतीला मिळाला. भंडारा येथील महिला समाज माध्यमिक विद्यालयातील वर्ग १० वी ची सई बनकर यांच्या ग्रीन डस्ट बिनला दुसरा, मोहाडी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय येथील वर्ग १२ वी ची प्रियांशू समरीत यांच्या स्मार्ट हेल्मेट ला तिसरा क्रमांक मिळाला. लोकसंख्या शिक्षणमध्ये उच्च प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगलीचे शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांच्या तंबाखूचे वास्तव दुष्परिणाम ला प्रथम, राजेदहेगाव येथील जिल्हा परिषद शाळाचे शिक्षक रामप्रसाद मस्के यांच्या लोकसंख्या व किशोरवयाचे शिक्षणला द्वितीय, पिंपळगाव मोहाडी येथील पंचशील प्राथमिक शाळाचे शिक्षक के.के. डोंगरवार यांच्या प्लास्टीक प्रदूषणला तृतीय पारितोषिक मिळाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटात नरसिंह टोला येथील गजाननराव रंभाड विद्यालय येथील शिक्षक के.एस. रेहपाडे यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे या विषयाला प्रथम, डोंगरला येथील पंडीत दीनदयाल उपाध्याय विद्यालय येथील एन.व्ही. कापगते यांच्या लोकसंख्या शिक्षणाचे महत्वाचे पैलूला दुसरा तर कोथुर्णा येथील नवप्रभात हायस्कुलचे शिक्षक ए.एस. कांबळी यांच्या आरोग्य व स्वच्छता या विषयाला तिसरे पारितोषिक मिळाले. शैक्षणिक साहित्य माध्यमिक उच्च माध्यमिक वर्ग ९ ते १२ गटात एकोडी येथील कामाई करंजेकर माध्यमिक विद्यालयाचे एन.सी. पटले यांच्या गणित प्रयोगशाळेला प्रथम, उच्च प्राथमिक शिक्षक वर्ग ६ ते ९ मधील एकोडीचेच जि.प. हायस्कुुलचे शिक्षक बी.एफ. शिंदे यांच्या वैज्ञानिक शैक्षणिक साहित्याला प्रथम तर प्रयोगशाळा सहाय्यक परिचय गटात शैक्षणिक साधन स्पर्धेत पहेला येथील गांधी विद्यालय येथील ज्ञानदेव मेश्राम यांच्या प्रयोगशाळेतील साहित्याला प्रथम पुरस्कार मिळाला. प्रास्ताविक प्राचार्य एस.एस. शेंदरे यांनी केले. संचालन प्रा.शिलवंतकुमार मडामे यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्थापक अध्यक्ष वासुदेवराव गजभिये यांनी मानले.
विद्यार्थ्यांमध्ये सृजनशिलतेचे विचार रूजविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:54 IST
शेतकरी आपला पोशिंदा आहे. विकेल तर आपण टिकू. बालकांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण करा. आपण तयार केलेली प्रतिकृती वर्तमान घडामोडीनुरूप आहे का, याचा पडताळणी करून पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यापनादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये सृजनशिलतेचे विचार रूजविण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लक्ष्मण पाच्छापुरे यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये सृजनशिलतेचे विचार रूजविणे गरजेचे
ठळक मुद्देलक्ष्मण पाच्छापुरे : जिल्हा विज्ञान प्रदर्शनात वंश देशपांडे, आयुषी धावडेची प्रतिकृती अव्वल