शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

शिक्षणासोबत शील असणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:33 IST

शाळा महाविद्यालयीन शिक्षण ग्रहण करीत असताना आई-वडीलांना आदर्श, थोरा-मोठ्यांचे विचार, जुनी-नविन संस्कृती यांची सांगड घालुन पुढील येणाऱ्या नवीन पिढीला आदर्श घडविण्याचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांनी करावे.

ठळक मुद्देरासेयो शिबिराचा समारोप : राजकपूर राऊत यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : शाळा महाविद्यालयीन शिक्षण ग्रहण करीत असताना आई-वडीलांना आदर्श, थोरा-मोठ्यांचे विचार, जुनी-नविन संस्कृती यांची सांगड घालुन पुढील येणाऱ्या नवीन पिढीला आदर्श घडविण्याचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांनी करावे. अहंकार बाळगू नये. शिक्षण ग्रहण करीत असताना शील असणे आवश्यक आहे. नाही तर शिक्षणाला काहीच अर्थ राहत नाही, असे प्रतिपादन माजी समाज कल्याण सभापती राजकपूर राऊत यांनी केले.ओम सत्यसाई कला व विज्ञान महाविद्यालय परसोडी-ठाणाद्वारे राजेदहेगाव येथील सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोपप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी सभापती राजकपुर राऊत बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक चंद्रशेखर गिरडे हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध श्यामकुंवर, सरपंच रामचंद्र लेंडे, ग्रामपंचायत सदस्य विणा लेंडे, बबीता हुमणे, परसोडीचे ग्राम पंचायत सदस्य कुलदीप कावळे, मुख्याध्यापक रामप्रसाद मस्के, तिघरे, प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील, प्रा. डॉ. वंदना मोटघरे, प्रा. प्रिती बागडे, प्रा. प्रतिक घुले उपस्थित होते.मुख्याध्यापक रामप्रसाद मस्के म्हणाले की, सात दिवसीय रासेयो शिबिराच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना खुप काही शिकायला मिळाले. स्वच्छ भारत घडवायचा असेल तर मनापासुन तयारी असावी. सरपंच रामचंद्र लेंडे म्हणाले की, सात दिवसीय शिबिरामुळे गावातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकोप्याची भावना निर्माण झाली.गावाचा विकास कसा केव्हा व कोठे करावा हे या रासेयो शिबिरातुन शिकायला मिळाले. शिबिराच्या माध्यमातुन आम्ही गावांचा विकास साधु. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुवर म्हणलो की, राज्यशासन व केंद्र शासनाद्वारे रासेयो कार्यक्रम घेऊन प्रत्येक गावात राबविणे आवश्यक आहे. जेणे करुन व्यक्तीमहत्व विकास व ग्राम स्वच्छता अभियान प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निर्माण होऊन गाव सुजलाम - सुफलाम होणार अध्यक्षीय भाषणात रासेयो कनिष्ठ जिल्हा समन्वयक चंद्रशेखर गिरडे म्हणाले की, ग्रामीण खेडेगावात विकास करण्याची समस्या भयावह आहे.रासेयोच्या माध्यमातुन त्या-त्या गावातील प्रथम समस्याचा शोध घेऊन त्यांचे समतारुपी समाधान करणे रासेयो शिबिराच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे कर्तव्य आहे. माणसा-माणसातील दुरी निर्माण करणाºयाना दूर सारत माणूस जोडणारे निर्माण करा. याकरिता विद्यार्थ्यांमध्ये प्रेमभाव निर्माण होणे काळाची गरज आहे. अपुºया साधन सामुग्रीद्वारे गाव विकास कसा साधता येईल, याचे साहित्य निर्माण करा.सदर सात दिवसीय शिबिरात बौध्दीक चर्चा सत्र, व्यसनमुक्ती आणि आजचा युवक, महिला अत्याचार व बालगुन्हेगारी, महिलांचे अधिकार व फायदा विषयक माहिती अनुक्रमे प्रा. ज्योती रामटेके, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, महिला समुपदेशक मृणाल मुनेश्वर यांनी ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनच्या स्वयंसेवकांना सखोल मार्गदर्शन केले.प्रास्ताविक प्रा. प्रतिक घुले यांनी केले. संचालन प्रा. आशा कांबळे यांनी केले. तर आभार प्रा. रंगारी यांनी मानले. सदर सात दिवसीय शिबिरासाठी ग्रामपंचायत राजेदहेगावचे पदाधिकारी सदस्य, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त गाव समिती, प्रतिष्ठीत नागरिक व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रिती बागडे, सहायक अधिकारी प्रतिक घुले, प्रा. रंगारी, प्रा.डॉ. वंदना मोटघरे रासेयोच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.